दोन वर्षांपासून पीडीसीसी कडे ३१ लाख पडून जिल्हा परिषदेच्या स्थ्यायी समितीच्या बैठकीत मुद्दा गाजला हिंगोली - जिल्हा परिषदेचे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे मागील दोन वर्षांपासून ३१ लाख रुपये पडून होते याची कल्पना वित्त विभागाचे मुख्य लेखा अधिकारी हिवाळे यांना माहित नसल्याचा खळबळ जनक आरोप जिल्हा परिषद सदस्य अजित मगर यांनी गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या पहिल्यांदाच ऑनलाईन बैठकीत उपस्थित केला. येथील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी तीन महिन्यानंतर ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरस तहकूब सभा घेण्यात आली.यावेळी जिल्हा परिषदेचे सीईओ राधा बिनोद शर्मा, उपाध्यक्ष मनीष आखरे, समाज कल्याण सभापती फकिरा मुंढे, रत्नमाला चव्हाण, महिला बालकल्याण सभापती रूपालीताई पाटील ,अजित मगर, अतिरिक्त सीईओ डॉ. मिलिंद माळी, धनवंतकुमार माळी , गणेश वाघ ,यांच्यासह विभाग प्रमुखांची उपस्थिती होती. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे कामे सुरू आहेत. ही कामे निकृष्ट दर्जाची होत असून या कामाची चौकशी करण्याची मागणी अजित मगर यांनी लावून धरली असता यावर आरोग्य अधिका...