हिंगोलीत आणखी अकरा कोरोना पॉझिटिव्ह नऊ रुग्ण निगेटिव्ह
हिंगोलीत आणखी अकरा कोरोना पॉझिटिव्ह नऊ रुग्ण निगेटिव्ह रुग्ण संख्या पोहचली २८ वर ,रुग्ण संख्येचा आलेख होतोय चढ उतार हिंगोली - सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात भरती केलेले दोन रुग्ण तसेच औरंगाबाद येथे भरती केलेला रुग्ण शिवाय वसमत येथील आठ असे मिळून एकूण अकरा रुग्ण बुधवारी ठणठणीत बरे झाल्याने त्यांना घरी सुट्टी देण्यात आली आहे. तर आज नव्याने नऊ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने रुग्ण संख्या आता २८ वर गेली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किशोर प्रसाद श्रीवास यांनी सांगितले. दरम्यान, हिंगोली आयसोलेशन वॉर्डातील दोन, औंढा येथील एक, तसेच वसमत कोरोना सेंटर येथील आठ असे अकरा रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. यात हट्टा दोन, गिरगाव दोन, कुरुडवाडी एक, हयातनगर एक, औंढा एक, वसमत शहर एक अश्या नऊ व हिंगोली दोन, औंढा एक असे मिळून अकरा रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे.आज रोजी एकूण अकरा कोरोना रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे आता२८ कोरोना बाधित रुग्णावर उपचार सुरू आहेत. शहरातील लिं...