कळमनुरीत नव्याने एका २२ वर्षीय युवकाला कोरोची लागण तर पाच रुग्ण निगेटिव्ह
कळमनुरीत नव्याने एका २२ वर्षीय युवकाला कोरोची लागण तर पाच रुग्ण निगेटिव्ह रुग्ण संख्या पोहचली ३३ वर हिंगोली - कळमनुरी येथे क्वारंटाइन केलेल्या एका नव्याने २२ वर्षीय पुरुषाला सोमवारी कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला असून, वसमत व हिंगोली येथील भरती केलेले पाच रुग्ण निगिटिव्ह आल्याचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. त्यामुळे रुग्ण संख्या ३३ वर गेली आहे. वसमत क्वारंटाइन सेंटर येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी अकोली एक व हट्टा दोन असे तीन रुग्ण बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे. तर सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात भरती केलेल्या दोन रुग्णांना बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. यामध्ये रिसाला बाजार, व चोंढी खुर्द रुग्णाचा समावेश आहे. कळमनुरी येथे मुंबई वरून परतलेल्या एकाला क्वारंटाइन सेंटर येथे २२ वर्षीय पुरुषाला भरती केले होते.त्याला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला असल्याने कोरोना मुक्त झालेला कळमनुरी तालुका पुन्हा डोके वर काढला आहे. सोमवारी पाच रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.त्यांना सुट्टी देण्यात आली आह...