Posts

Showing posts from June 7, 2020

चिंताजनक ; क्वारंटाइन केलेल्या सात रुग्णांना कोरोनाची बाधा ,रुग्ण संख्या गेली ३७ वर 

Image
चिंताजनक ; क्वारंटाइन केलेल्या सात रुग्णांना कोरोनाची बाधा ,रुग्ण संख्या गेली ३७ वर  हिंगोलीने गाठले कोरोनाचे द्विशतक हिंगोली - जिल्ह्यातील सेनगाव येथे मुंबई वरून परतलेल्या सात व्यक्तींना क्वारंटाइन केले होते. या सर्वांचे स्वाब अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आल्याचे अहवालावरून स्पस्ट झाले आहे. यामुळे रुग्ण संख्या ३७ वर गेली असली तरी कोरोनाने द्विशतक गाठले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कुमार प्रसाद श्रीवास यांनी दिली आहे. शनिवारी औंढा तालुक्यातील एका ३७ वर्षीय पुरुषाला औरंगाबाद येथे भरती करण्यात आले होते त्यास कोरोनाची लागण झाल्याचे अहवालावरून स्पस्ट झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जिल्ह्यात आतापार्यंत कोरोना रुग्णांनी द्विशतक आकडा पार केला असून, त्यापैकी १६३ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. आजघडीला ३७ रुग्णावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, वसमत कोरोना केअर सेंटर येथे भरती करण्यात आलेल्या रुग्णामध्ये हट्टा चार, गिरगाव दोन, अकोली एक, कुरुडवाडी एक,  हयातनगर चार, कौठा एक, वसमत शहर एक, एकूण१४ रुग्णांचा समावेश आहे. या सर्वांची प्रकृती ठणठणीत असून कोणत्याही प्रका...

दिलासादायक : लातूर जिल्यात फक्त 01 पॉझिटीव्ह, औसा - येल्लारी येथील

Image
लातुर 25 पैकी 24  निगेटीव्ह 01पॉझिटीव्ह               *जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 33, उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 111 व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 4*            विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 07.06.2020 रोजी लातुर जिल्हयातील एकुण 25 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 15 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते  त्यापैकी 14 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  सदर व्यक्ती औसा तालुक्यातील येल्लोरी येथील असून मुंबई येथून प्रवास करून आलेली आहे. त्यांना ताप, खोकला, अंगदुखी अशी लक्षणे असून त्यांना  निमोनिया असल्याचे कोरोना विलगीकारण कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे यांनी दिली. उपजिल्हा रुग्णालय, निलंगा 01,  औसा 08, कासारशिरसी 01 असे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्या सर्व व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह  आले  आहेत असे लातुर जिल्हयातील एकुण 25 व्यक्त...

पोहण्यासाठी गेलेल्या तिन युवकाचा धरणात बुडुन मृत्यृ

  पोहण्यासाठी गेलेल्या तिन युवकाचा धरणात बुडुन मृत्यृ तालुक्यातील मोरगव्हाण येथील घटना कळमनुरी  - पोहण्यासाठी  गेलेल्या  पाच जणांपैकी तिघांचा कळमनुरी तालुक्यातील  मोरगव्हाण जवळील ईसापुर धरणात बुडुन मृत्यु झाल्याची घटना  रविवारी (ता.७)   दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास घडली. या तिघांचेही मृत देह सापडले असुन मयत तरुण हे हिंगोली येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. शिवम सुधीर चौंढेकर (२१), रोहित अनिल चित्तेवार (२२), योगेश बालाजी गडप्पा (२१) अशी  धरणात बुडालेल्या तरुण मुलांची नावे आहेत. याबाबत सविस्तर  माहिती अशी की, शिवम सुधीर चौंढकर(२१) राहणार भट्ट काॅलनी हिंगोली, रोहित अनिल चित्तेवार (२२) रा. पोस्ट आफीस रोड हिंगोली, योगेश बालाजी गडप्पा (२१) रा. बियाणी नगर तसेच श्रीकांत संजीव चौंढेकर व निखील नागोराव बोलके दोघे ही राहणार हिंगोली हे पाचजण मित्र हिंगोली येथुन कळमनुरी  तालुक्यातील मोरगव्हाण जवळील ईसापुर धरणात पोहण्यासाठी गेले होते. पोहल्यानंतर श्रीकांत व निखील हे दोघे जण धरणाबाहेर आले. परंतु शिवम, रोहित आणी योगेश हे पाण्या बाहेर आले...