Posts

Showing posts from June 4, 2020

दादर नगर हवेली येथून दहा मजुर गावी परतले खासदार  राजीव सातव यांचा पुढाकार

Image
दादर नगर हवेली येथून दहा मजुर गावी परतले खासदार  राजीव सातव यांचा पुढाकार जिल्‍ह्‍यातील  केंद्रशासित प्रदेशात कामानिमित स्‍थलांतरीत झालेले आदीवासी बांधव बुधवारी  जिल्‍ह्‍यात परत आले असून त्‍यांना गावापर्यत पोहचविण्यासाठी खासदार  राजीव सातव यांनी मदत केली आहे. तर यासाठी जिल्‍हा परिषद सदस्य डॉ. सतिश पाचपुते यांनी पाठपुरावा केला आहे.  जिल्‍ह्‍यातील वसमत व कळमनुरी तालुक्‍यातील आदीवासी समाज बांधव कामासाठी दादर नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात स्‍थलांतरीत झाले होते. सध्या येथे चक्रिवादळाचा तडाखा बसत असल्याने अनेकांना सोयीची ठिकाणी ठेवण्यात आले आहे. त्‍यात हिंगोली जिल्‍ह्‍यातील दहा आदीवासी समाज बांधवाचा यात समावेश आहे. मागच्या काही दिवसापासून चक्रीवादळ येथे येणार असल्याची माहिती दिल्यानंतर हे मजुर गावी जाण्यासाठी प्रयत्‍न करीत होती. मात्र त्‍यांना अडचणी येत होत्या त्‍यांनी ही बाब जिल्‍हा परिषद सदस्य तथा आदिवासी युवक कल्याण संघाचे जिल्‍हाध्यक्ष डॉ. सतिश पाचपुते यांना सांगितले. ही माहिती खासदार  राजीव सातव यांना सांगितली. त्‍यानंतर खासदार सातव यांनी यासाठी पुढाकार ...

दिलासादायक ; हिंगोलीत एकाच दिवशी दहा रुग्ण निगेटिव्ह तर तीन पॉझिटिव्ह

Image
दिलासादायक ; हिंगोलीत एकाच दिवशी दहा रुग्ण निगेटिव्ह तर तीन पॉझिटिव्ह रुग्ण संख्या पोहचली २५ वर ,कही खुशी कही गम हिंगोली -  जिल्ह्यात आयसोलेशन वॉर्ड व कोरोना केअर सेन्टर येथे ३५ पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरु होते. मात्र गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास अहवाल प्राप्त होताच  दहा रुग्ण निगेटिव्ह आल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. तर मुंबई वरून वसमत तालुक्यात परतलेल्या तीन रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यात बारा वर्षीय मुलीचा समावेश असून आता रुग्ण संख्या २५ वर गेली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकितस्क डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी पत्रकारांना दिली. त्यामुळे जिल्ह्यात कही खूसी कही गम अशी परिस्थिती आहे. दरम्यान, कळमनुरी कोरोना केअर सेंटर येथे सुमारे आठ  रुग्ण कोरोना बाधित होते. यामध्ये घोडा कामठा, कांडली एक, चाफनाथ एक, आडा एक, येडसी तांडा येथील रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. तर जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आलेल्या पैकी गंगानगर व सेनगाव तालुक्यातील माझोड येथील एक रुग्ण असे एकूण दोन रुग्ण ठणठणीत झाल्याने घरी सुट्टी देण्यात आली. अ...

आजचे लातुर जिल्ह्यतील सर्व 28 पैकी  28 निगेटीव्ह

Image
  आजचे लातुर जिल्ह्यतील सर्व 28 पैकी  28 निगेटीव्ह    विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 04.06.2020 रोजी लातुर जिल्हयातील एकुण 28 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 27 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते  त्यापैकी सर्वच 27   व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. उपजिल्हा रुग्णालय, निलंगा येथुन एका व्यक्तींचा स्वॅब तपासणीसाठी आला होता त्या व्यक्तींचा अहवाल  निगेटीव्ह आला आहे.  असे लातुर जिल्हयातील एकुण 28 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच 28  व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले  आहेत अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली. लातुर शहरातील काही रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह येत असुन त्यातील काही जणांना  कोणतीही लक्षणे नाहीत व इतर कोरोना प्रभावित शहरातुन प्रवास केलेला नाही तरीही काही व्यक्तींचे अहवाल अज्ञात पॉझिटीव्ह व्यक्तींच्या संपर्कात आल्यामुळे पॉझिटीव्ह ये...

खुशखबर : लातूर शहरातील 06, व जिल्ह्यातील 07 एकूण 13 रुग्णांची रुग्णालयातुन सुट्टी

Image
13 रुग्णांची प्रकृती ठणठणीत झाल्यामुळे रुग्णालयातुन सुट्टी आज एकूण रुग्ण संख्या :- 44 बरे होऊन घरी गेलेले :- 94 कोरोनाने मृत झालेले  : 04 विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील आज दिनांक 04.06.2020 रोजी एकुण 13 रुग्णांची प्रकृती पुर्णपणे बरी झाली असुन हे सर्व रुग्ण 06 ते 65 वर्षे वयोगटातील आहेत. एकुण 13 रुग्णांपैकी ०9 रुग्णांना कोविड-19 निमोनियाची लक्षणे होती व गंभीर स्वरुपाचा आजार होता. यातील एक रुग्ण ०७ दिवस व्हेंटीलेटर सपोर्टवर होता. मागील 05 ते 06 दिवसापासुन या रुग्णांना कोणतीही लक्षणे दिसुन आली नसल्यामुळे आय. सी. एम. आर. च्या नविन प्राप्त डिस्चार्ज् (रुग्णांना घरी सोडण्याच्या) मार्गदर्शक सुचनेनुसार त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आले. त्यातील ०७ व्यक्तींना Home Quarantine व ०६ व्यक्तींना Institutional Quarantine करण्यात येणार आहे. यातील 06 रुग्ण लातुर शहरातील व 06 लातुर जिल्हयातील ग्रामीण  भागातील असुन ०१ रुग्ण उस्मानाबाद जिल्हयातील आहे. तसेच यामध्ये ०६ वर्षाची एक मुलगी असुन तीने सुध्दा कोरोना वर मात केली आहे अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कर...