लातूर शहरासह 06, उदगीर 01 तर जिल्ह्यातील 07 पुनर्तपासणीत पुन्हा +Ve, उस्मानाबाद 07, बीड 01
दि.30 मे 2020 *लातुर 86 पैकी 61 निगेटीव्ह, 07 पॉझिटिव्ह, 09 अनिर्णित, 2 रद्द* *लातूर जिल्ह्यात आज नवीन 7 रुग्ण पॉझिटिव्ह* *उस्मानाबाद 52 पैकी 44 निगेटीव्ह, 07 पॉझिटिव्ह व 01 अनिर्णित* *बीड 38 पैकी 37 निगेटीव्ह व 01 पॉझिटिव्ह* विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 30.05.2020 रोजी एकुण 176 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 37 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 19 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 11व्यक्तींचे अहवाल पॉ झिटिव्ह आलेले( 11 पैकी 7 रुग्णांची पुनर्तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहे) आहेत व 06 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले असून एका व्यक्तीच्या स्वॅब परीपूर्ण न आल्यामुळे रद्द करण्यात आला आहे. यापूर्वीच 07 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्यामुळे त्यांना अगोदर पासूनच या संस्थेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीच्या 6 दिवसामध्ये 07 ही रुग्णांना कोरोना (कोविड19) चे लक्षणे होते.मागील 3-4 दिवसापासुन या रुग्णांना ताप, दम लागणे अथ...