Posts

Showing posts from May 29, 2020

आज एकाच दिवसात लातुर शहरात 10 पॉझिटिव्ह अहवाल

Image
मोती नगर लातूर येथील 09 व देसाई नगर यथील 01  एकूण 10 पॉझिटिव्ह अहवाल  विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 12  व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी 10 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी 09 व्यक्ती दिनांक 28.05.2020 रोजी मोती नगर लातूर येथे पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य आहेत व 1 व्यक्ती देसाई नगर लातूर येथील असून ती व्यक्ती मुंबई वरून प्रवास करून आलेली आहे त्यांना निमोनिया असून श्वास घेण्यास त्रास होत आहे त्यांना सध्या विलगीकरन कक्षात दाखल करण्यात आले आहे व  02 व्यक्तींचे अहवाल Inconclusive  आले आहेत अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे यांनी सांगितले. 

धक्कादायक : परभणी जिल्ह्यात आज 07 कोरोना पॉझिटिव्ह.

Image
    परभणी प्रतिनिधी- परभणी जिल्ह्यात शुक्रवारी रात्री दहा वाजेपर्यंत सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पुन्हा चांगलीच हादरली आहे, दरम्यान जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्ण संख्या 74 वर गेली आहे.   परभणी जिल्ह्यात गुरुवार हा दिलासादायक ठरला होता. परंतु शुक्रवारी पुन्हा एकदा जिल्ह्याला मोठा हादरा बसला आहे.जिल्ह्यात शुक्रवारी रात्री दहा वाजेपर्यंत एकूण सात कोरोना रुग्ण सापडल्याने आरोग्य विभागासह अन्य यंत्रणा चांगलीच हादरली आहे. जिल्ह्यात आज जिंतूर 2, मानवत 1,सेलू 2 गंगाखेड 2 असे रुग्ण सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला पुन्हा एकदा कोरणा सारख्या आजाराला तोंड द्यावे लागत आहे. रुग्ण सापडलेले संबंधित गाव रात्री उशिरापर्यंत सील करण्यात आले. शनिवारी सकाळी गावात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी तात्काळ ही गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहे. या गावांमध्ये ये-जा करण्यासाठी पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी तालुका प्रशासन पूर्णपणे गावांना सहकार्य करणार आहे. त्यामुळे...

लाचेची मागणी करणाऱ्या तलाठ्यावर एसीबीकडून गुन्हा दाखल

लाचेची मागणी करणाऱ्या तलाठ्यावर एसीबीकडून गुन्हा दाखल हिंगोली -  तालुक्‍यातील केसापुर शेत शिवारातील गट क्रमांक २९१,२९२,३०२,व ३०७ मधील शेताचा त्याच्या आईच्या व बहिणीच्या हक्कसोड पत्रा प्रमाणे जमिनीचा पेर त्याच्या भावाच्या नावाने घेऊन तसा सातबारा तयार करून देण्यासाठी घोटा सज्जाचे तलाठी सात हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती .मात्र लाचेची रक्कम स्वीकारण्यास संशय आल्याने नकार दिला. त्यावरून एसीबीच्या पथकाने गुरुवारी (ता.२८) सापळा रचून तलाठ्यावर गुन्हा दाखल केला आहे. चार दिवसातील ही लाचखोरीची दुसरी घटना आहे. दरम्यान, जिल्ह्यात लाचलुचपत विभागाच्या वतीने कितीही डोके फोडून, किंवा जनजागृती करून देखील लाच खोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कितीही कारवाई केली तरी अधिकारी यांच्याकडून लाच घेणे काही थांबत नाही. सध्या लाचेच्या बाबतीत बघायला गेले तर महसूल विभाग अव्वल असून त्या खालोखाल पोलीस विभाग, त्यानंतर पंचायत विभागाकडे पाहिले जाते. हिंगोली तालुक्यातील केसापुर शेत शिवारातील गट क्रमांक२९१,२९२,३०२,३०७,मधील शेताचा त्याच्या आई व बहिणीचे  हक्कसोड पत्रा प्रमाणे जमिनीचा फेर  त्याच्या...