Posts

Showing posts from May 27, 2020

डेंजर.... उदगीरचे 12 रुग्ण पॉझिटिव्ह, लातूर 1 उस्मानाबाद 04, बीड 01

Image
डेंजर.... उदगीरचे 12 रुग्ण पॉझिटिव्ह,   लातूर 1,  उस्मानाबाद 04,  तर बीड 01 रुग्ण +ve *लातूर जिल्हा कोरोना अपडेट* 27 मे * उपचार घेत असलेले  रुग्ण- 58 * उपचाराने बरे झालेले रुग्ण - 58 * मृत्यू झालेले रुग्ण - 3   दिनांक 27.05.2020 रोजी लातूर जिल्ह्यातील  एकूण 17 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी 13 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून  चार व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत.  त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेतील एका व्यक्तीचा अहवाल प्रलंबित होता त्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून तो 13 मे रोजी पुणे येथून प्रवास करून आलेला असून नांदेड रोड, लातूर येथे वास्तव्यास आहे व तो मूळचा भातांगळी येथील रहिवासी आहे. सद्यस्थितीत तो ऑक्सिजन वर असून त्याची प्रकृती स्थिर आहे. उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथील 16 व्यक्तीचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी  12 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 04 व्यक्तीचे अहवाल Inconclusive आले आहेत अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. ...

वसमत येथील ३१ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण

Image
  वसमत येथील ३१ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण एका एसआरपीएफ जवानाला सुट्टी ,रुग्ण संख्या स्थिर हिंगोली - मुंबई वरून वसमत तालुक्यात परतलेल्या एका ३१ वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाली तर औरंगाबाद येथील एका जवानाचा अहवाल बुधवारी निगेटिव्ह आल्याने सुट्टी देण्यात आल्याने  जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या  ७४ वर स्थिर आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाची लागण झालेल्या १६५ रुग्णापैकी ९१ रुग्ण बरे होऊन घरी परतल्याने सुट्टी देण्यात आली. असून सद्य स्थितिला ७४ रुग्ण संख्या ही कॉन्स्टंट आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यात कळमनुरी ८,सेनगाव १२,हिंगोली २९,वसमत १५ ,याठिकाणी कोरोना केअर सेंटर येथे कोरोना लागण झालेल्या रुग्णावर उपचार सुरु आहेत. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून कुठलेही गंभीर लक्षणे नसल्याचे सांगण्यात येते. तसेच औरंगाबाद येथील  एक जवान बरा झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. याशिवाय हिंगोली येथील  आयसोलेशन  वॉर्डात १० रुग्ण ,औंढा येथे एक, भिरडाएक, सुरजखेडा एक,समुदाय आरोग्य अधिकारी दोन,पहेनी एक, माझोड एक,अश्या१४ कोरोना बाधित रुग्णांना कोरोना केअर सेंटर येथे भरती कर...

.परभणी : जिल्ह्यातील रुग्णसंख्या 67 वर

Image
कोरोनाचा उद्रेक ः आणखी 31  बाधित जिल्ह्यातील रुग्णसंख्या 67 वर परभणी, दि.26(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मंगळवारी(दि.26) रात्री साडेआठ वाजता नांदेड येथील प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालानुसार आणखीन 31 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याची खळबळजनक माहिती हाती आली आहे. यात पूर्णेतील 10, सेलूतील 2, गंगाखेडातील 4, पालम 1, जिंतूर 2, परभणी 12 असे एकूण 31 रुग्ण असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 67 पर्यंत पोहचली आहे. जिंतूर तालुक्यातील सावंगी(भांबळे) येथील कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर या जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसह शासकीय यंत्रणेत सुध्दा प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. विशेषतः दिवस्दिवस संशयितांसह कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येतील  तसेच बाधित व्यक्तींच्या संपर्कातील क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींच्याही वाढीने प्रशासनात चिंतेचे वातावरण पसरले आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत 265 संशयितांचे स्वॅब नांदेड येथील प्रयोगशाळेत प्रलंबीत होते. त्यापैकी 34 अनिर्णायक आहेत. रविवारी रात्रीपर्यंत  कोरोनाबाधि...

पुन्हा मुंबई कनेक्शन ;हिंगोलीत आणखी चौघे जण पॉझिटिव्ह

Image
रुग्ण संख्या पोहचली  ७४ वर   हिंगोली - मुंबई वरून हिंगोली तालुक्यात परतलेल्या एका ११ वर्षीय बालकासह वसमत तालुक्यातील हट्टा येथील क्वारंटाइन सेंटर मध्ये भरती केलेल्या २९ वर्षीय पुरुषासह औंढा येथील कोरोना सेंटर येथील दोघांना  कोरोनाची बाधा झाल्याचे मंगळवारी रात्री  प्राप्त अहवालावरून समोर आले आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या  ७४ वर गेली आहे. दरम्यान ,पालिकेच्या स्वछता कर्मचाऱ्याच्या दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्याचे स्वाब नमुनेनांदेड येथील प्रयोग शाळेकडे पाठविले होते. त्याचा अहवाल आज निगेटिव्ह प्राप्त झाला आहे.त्यामुळे पालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सुटकेचा मोकळा श्वास घेतला आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यात कळमनुरी ८,सेनगाव १२,हिंगोली २९,वसमत १४ ,तर औंढा याठिकाणी कोरोना केअर सेंटर येथे कोरोना लागण झालेल्या रुग्णावर उपचार सुरु आहेत. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून कुठलेही गंभीर लक्षणे नसल्याचे सांगण्यात येते. तसेच एका एसआरपीएफ जवानांवर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहेत.  याशिवाय हिंगोली येथील  आयसोलेशन  वॉर्डात ८ रुग्ण ,औंढा येथ...