सुधारीत…आज एकाच दिवसात लातूर 12 रूग्ण, बीड 06, उस्मानाबाद 05 ने वाढले
*लातुर जिल्हयातील 70 पैकी 67 निगेटीव्ह, 2 पॉझिटिव्ह व 1 अनिर्णित* *उस्मानाबाद 77 पैकी 61 निगेटीव्ह, 05 पॉझिटिव्ह व 11 प्रलंबित* *बीड 28 पैकी 22 निगेटीव्ह, 06 पॉझिटिव्ह* लातूर, दि.26 (जिमाका) :- विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 26 मे 2020 रोजी एकुण 175 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 30 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच 30 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. एम. आय. एम. एस. आर. वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथील 17 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच 17 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. स्त्री रुग्णालय लातूर येथून एका व्यक्तीचा स्वॅब तपासणीसाठी आला होता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. विवेकानंद हॉस्पिटल लातूर येथून एका व्यक्तीचा स्वॅब तपासणीसाठी आला होता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. उपजिल्हा रुग्णालय, उदगीर य...