Posts

Showing posts from May 24, 2020

हिंगोलीत कोरोना बाधितांचे अर्धशतक पार

Image
  हिंगोलीत कोरोना बाधितांचे अर्धशतक पार   औरंगाबाद येथील  एसआरपीएफ रुग्ण निगेटिव्ह ,रुग्ण संख्या  पोहचली ६१ वर   हिंगोली - जिल्ह्यात आतापर्यंत १५१ जणांना कोरोनाची लागण झाली असून यातील ९० रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे कोरोना बाधितांनी अर्धशतकाचा आकडा पार केला असून रुग्ण संख्या ६१ वर पोहचली आहे.   दरम्यान, औरंगाबाद येथे भरती करण्यात आलेल्या एका  एसआरपीएफ जवानाचा पॉझिटिव्ह अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला असल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. यातील एक जवान भरती असून त्याला कुठल्याही प्रकारचे गंभीर लक्षणे नसल्याचे सांगण्यात येते.   सेनगाव येथील कोरोना सेंटर मध्ये कोरोना लागण झालेल्या १२ रुग्णावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच शहरातील लिंबाळा येथील कोरोना सेंटर येथे३१ रुग्णावर उपचार सुरु आहेत. याशिवाय वसमत येथील कोरोना सेंटर येथे १३ पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरु आहेत. तर जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात चार रुग्ण असून यामध्ये औंढा दोन, भिरडा एक, सुरज खेडा एक, यांचा समावेश आहे.  ...

लातूर-04, उदगीर-05, अहमदपूर- 02, एकुण- 11, उस्मानाबाद - 06, बीड - 06 पॉझिटिव्ह

Image
    *लातूर जिल्हयातील 110 पैकी 93  निगेटीव्ह, 11 पॉझिटिव्ह, तर 06 अनिर्णित*   *उस्मानाबाद 47 पैकी 35 निगेटीव्ह, 06 पॉझिटिव्ह, तर  06 अनिर्णित*   *बीड 40 पैकी 33 निगेटीव्ह, 06 पॉझिटिव्ह तर 01 अनिर्णित*     लातूर, दि. 24(जिमाका):- विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 23.05.2020 रोजी एकुण 197 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 34 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते  त्यापैकी  30 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून 4 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. चारही रुग्ण काल पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या मुलीच्या कुटुंबातील आहेत व एम. आय. डी. सी. हडको येथील असून त्यांना कुठल्याही प्रकारचे लक्षणे नाहीत त्यांची सद्यस्थितीत प्रकृती ठीक आहे.           उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 51 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी असुन त्यापैकी  44 व्यक्तींचे अहवाल   निगेटीव्ह आले असुन  5 व्यक्तींचे  अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 2  व्यक्...

हिंगोली, जिल्‍ह्‍यात शहरी, ग्रामीण भागातील काही क्षेत्र कंटेनमेंट झोन घोषीत

जिल्‍ह्‍यात शहरी, ग्रामीण भागातील काही क्षेत्र कंटेनमेंट झोन घोषीत   हिंगोली,  : जिल्ह्यातील काही भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने त्‍याचा प्रादूर्भाव होवू नये यासाठी शहरी व ग्रामीण क्षेत्रातील काही भाग हा कंटेनमेंट झोन म्हणून घोषीत करण्यात आला असल्याचे जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी रविवारी सांगितले.   कंटेनमेंट झोन मध्ये हिंगोली शहरातील सिध्दार्थनगर, जवळा पळशी रोडची डावी बाजू, बागवानपूरा-तलाब कट्टा मस्जीदच्या पाठीमागे आणि गुहा चौक-पेन्शनपूरा या भागाचा समावेश आहे. तसेच ग्रामीण भागात हिंगोली तालूक्यातील बासंबा, खंडाळा, इंचा, वडद, माळसेलु, लिंबाळा, गंगानगर (कारवाडी ग्रामपंचायत क्षेत्र) आणि आनंदनगर (बळसोंड ग्रामपंचायत क्षेत्र) तर सेनगाव तालूक्यातील माझोड, बरडा, खुडज आणि सुरजखेडा हे गावे कंटेनमेंट झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे.   कंटेनमेंट झोन परिसरातील नागरिकांच्या हालचालीवर बंधने घालण्यात आले असून सर्व आवश्यक सेवा या भागात बंद करण्यात आल्या आहेत. या सेवा ग्रामपंचायत मार्फत वेळोवेळी आवश्यकतेनुसार देण्यात येणार आहेत. या कंटेनमेंट झोन आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच...

दहा हजाराची लाच घेताना जमादार एसीबीच्या जाळ्यात

Image
दहा हजाराची लाच घेताना जमादार एसीबीच्या जाळ्यात   हिंगोली -  तालुक्‍यातील मालसेलू येथील जागेचा जुना वाद मिटविण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या बिट जमादारास एसीबीच्या पथकाने रविवारी (ता.24) रंगेहात पकडले.    हिं गोली तालुक्यातील मालसेलू येथे अनेक वर्षांपासून जागेचा वाद आहे. हा वाद कोर्टात सुरू असून, या जागेत  अतिक्रमण करण्यात आलेले आहे. हे अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रारदाराने तक्रार  दिली होती. त्यानुसार बिट जमादार नंदकिशोर मस्के यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. नंतर अतिक्रमण हटवून देण्यासाठी 25 हजार रुपयांची मागणी केली होती.   मात्र तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने, त्याने थेट लाचलुचपत कार्यालय गाठून बिट जमादाराविरुध्द  तक्रार दाखल केली. त्‍यानंतर त्‍याची पडताळणी करण्यात आली होती.    त्यानुसार लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक हनुमंत गायकवाड, पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, पोलिस निरीक्षक ममता अफुणे व इतर कर्मचाऱ्याच्या पथकाने रविवारी माळसेलु परिसरातील शेतशिवारात स...

उदगीर-लोणीचा मृतरूग्ण सारी रोगाची लागन झालेला

Image
  लातूर जिल्ह्यात उदगीर चा रूग्ण सारी रोगाचा उदगीर ः लातूर जिल्ह्यतील उदगीर तालुक्यातील लोणी येथील 78 वर्षीय पुरूष जातीचा रूग्ण हा सारी रोगाची लागन झालेला होता. त्यांचा 22.05.2020 रोजी स्वॅब तपासणी केली असता तो सारी चा रूग्ण  असल्याचे 23.05.2020 ला निष्पन्न झाले परंतु दुर्देवाने त्यांचा त्याच दिवशी मृत्यु झाला, या मुळे लोणी गाव कन्टेनमेंट झोन मध्ये गेले आहे. रविवार, दिनांक 24.05.2020 सांय 5.00 पर्यंत रूग्णाची संख्या लातूर  ः- एकूण  05  उपचार घेत असलेले 10  पुरूष ः 08, स्त्रि 02 माळी गल्ली  ः- 01 लेबर कॉलनी  ः- 01 हडको  ः- 01 काळे बोरगाव ः- 02 उदगीर ः  एकूण 50   उपचार घेत असलेले 21  (पुरूष ः 12, स्त्रि 09) उदगीर शहर   ः - 39 बोरतळा तांडा   ः- 09 चिमाची वाडी   ः- 01 लोणी              ः - 01 निलंगा    ः - एकूण 18  उपचार घेत असलेले 10  (पुरूष ः 06, स्त्रि 04) कोराळी   ः- 07 लांबोटा   ः - 01 का.सिरशी  ः-02 जळकोट   ः- एकूण 02 गव्हाण   ...

धक्कादायक ; हिंगोलीत एकाच दिवशी ५० रुग्ण 

Image
  धक्कादायक ; हिंगोलीत एकाच दिवशी ५० रुग्ण   रुग्ण संख्या पोहचली ६२ वर    हिंगोली -   मुंबई येथून औंढा तालुक्यात आलेल्या एका व्यक्तीसह वसमत तालुक्यातील व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे शनिवारी सकाळी स्पष्ट झाले आहे . तर रात्री उशिरा आलेल्या अहवालात मुंबई, दिल्ली येथून परतलेल्या सेनगाव तालुक्यातील १३ व कोरोना  सेंटर लिंबाळा गेथील  ३१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे . त्यामुळे जिल्ह्यात शनिवारी  एकाच दिवशी तब्बल ५० नवे रुग्ण आढळले आहेत . या मध्ये एका समुदाय आरोग्य अधिकाऱ्याचाही समावेश आहे .   शनिवारी सकाळी आलेल्या अहवालात मुंबईवरून हिंगोलीत परतलेल्या ६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे . त्यात पुन्हा कळमनुरी तालुक्यातील कामठा येथील एका ५३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागाची झोप उडाली  आहे.सेनगाव तालुक्यातील तब्बल १३ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत . या मध्ये मुंबई वरून परतलेले खुडज येथील ९ , दिल्ली येथून बरडा येथे आलेले ३ तर गोरेगाव येथे क्वारंटाईन असलेले सुरजखेडा येथील एका रुग्णाचा समावेश आहे . तर कोरोना केअर स...

कळमनुरी तालुक्यात कोरोनाचे आठ रुग्ण आढळले, गाफील राहिलेल्या तालुक्यात कोरोनाने काढले डोके

Image
    कळमनुरी तालुक्यात कोरोनाचे आठ रुग्ण आढळले   गाफील राहिलेल्या तालुक्यात कोरोनाने काढले डोके    हिंगोली - मुंबई, रायगड, पुणे येथून गावी परतलेल्या आठ रुग्णांना कोरोनाची लागण झाली असल्याचा अहवाल रविवारी उशिराने प्राप्त झाला आहे. यामुळे गाफील राहिलेल्या कळमनुरी तालुक्यात आता कोरोना रुग्णांनी डोके वर काढले आहे. त्यांमुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ६९ वर पोहचली आहे.   दरम्यान, मुंबई चार, रायगड तीन , पुणे एक असे मिळून आठ व्यक्तीं कन्टेन्ट झोन मधून आपल्या मूळ गावी परतल्याने त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे अहवालावरून समोर आले आहे. आतापर्यन्त हिंगोली, सेनगाव, वसमत ,औंढा, या तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत गेली. मात्र एकमेव कळमनुरी तालुक्यात कोरोना चा अद्याप ही शिरकाव झाला नव्हता. कोरोनाचा शिरकाव होणार नसल्याचे पाहून आम्ही अलर्ट असल्याचे भासवून गाफील राहिलेल्या प्रशासनाला अखेर कोरोना रुग्णांचा सामना करावा लागत आहे. या बाहेर जिल्ह्यातून परतलेल्या मजुरांना कळमनुरी येथील कोरोना केअर सेंटर मध्ये उपचार सुरू केले आहेत. आता जिल्ह्यात१६९ रुग्ण झाले असून ...