Posts

Showing posts from May 22, 2020

हिंगोलीत भाजपाचे महाराष्ट्र बचाव आंदोलन 

Image
  कार्यकत्यांनी काळ्या फिती लावून घरोसमोर केले आंदोलन   हिंगोली - येथे भारतीय जनता पार्टीतर्फे शुक्रवार (ता.22) महाराष्ट्र राज्य कोरोना रुग्ण संख्येत नंबर एकवर आले आहे. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टी तर्फे महाराष्ट्र बचाव आंदोलन कार्यकर्त्यानी आपल्या घरोसमोर केले.     कोरोना साथीच्या काळात महाराष्ट्र शासन सपशेल अपयशी ठरले आहे .मजूर उपाशी मरत आहेत .शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदी केल्या जात नाही रुग्णांना रुग्णसेवा मिळत नाही, पोलीस कर्मचारी साथीच्या रोगात बळी पडत आहेत मजुरांना कामे नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे देशात महाराष्ट्र राज्य कोरोना रुग्ण संख्येत नंबर एक वर आले आहे. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टी तर्फे महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले.    सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी आपल्या घरासमोर पुढे राहून काळ्या फिती लावून सरकारचा निषेध केला. यावेळी  आमदार तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबारावजी बांगर ,संघटन सरचिटणीस फुलाजीराव शिंदे, अॅड. के. के. शिंदे ,कैलासशेठ काबरा, सुनिल जामकर,...

कोरोना संशयितांचे २७२ अहवाल प्रलंबीतच !

Image
    कोरोना संशयितांचे २७२ अहवाल प्रलंबीतच !   हिंगोली - जिल्ह्यात कोरोना लागण झालेल्या व्यक्तींची संख्या निम्न स्तरावर घसरली असली तरी आतापर्यंत दोन हजार लोकांना भरती करण्यात आले होते यातील काहींना सुट्टी देण्यात आली तर काहींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आजघडीला  ३२५ रुणांपैकी २७२ रुग्णांचे अहवाल प्रलंबित असल्याने हा अहवाल पॉझिटिव्ह कि निगेटिव्ह  येणार याकडे  सर्वांचे लक्ष लागले आहे.   जिल्ह्यात कोरोनाची बाधा झालेले १०१ रुग्ण आढळून आल्याने रेड झोनकडे हिंगोलीने आगेकूच केली होती. मात्र यातील ८९ रुग्ण ठणठणीत होऊन बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे सद्या १२ पॉझिटिव्ह रुग्ण संख्या असून त्यांच्यावर आयसोलेशन वॉर्डात उपचार सुरु आहेत. त्यामुळे शुक्रवारी ना निगिटिव्ह ना पॉझिटिव्ह अशी स्थिती होती.   औरंगाबाद येथील धूत हॉस्पिटल येथे भरती करण्यात आलेल्या सहा  कोरोनाची बाधा असलेल्या जवानांना भरती केले होते. मात्र गुरुवारी यातील चार एसआरपीएफ पॉझिटिव्ह जवानांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना सुट्टी देण्यात आल्याने आता केवळ दोन जवानांवर उपचा...

लातुर 4 पैकी कासारशिरसी येथील २, अहमदपुर-2, कोरोना रुग्ण

Image
  लातुर ६ पैकी ४ पॉझिटीव्ह १ निगेटीव्ह व १ इनकन्क्लूजीव   लातूर, दि.22:-  लातूर जिल्ह्याचे दिनांक 21.05.2020 रोजीचे एकुण ११ अहवाल प्रलंबित होते त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील एका व्यक्तींचा अहवाल प्रलंबित होता त्या व्यक्तींचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. अहमदपुर खंडाळी येथील ३ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी २ व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले असुन एका व्यक्तीचा अहवाल (Inconclusive) आला आहे. कासारशिरसी येथील २ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी दोन्ही व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.   .*लातूर जिल्हा कोरोना विषाणू अपडेट(दिनांक 22 मे 2020)*   *जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्ण- 77*   *उपचार घेत असलेले रुग्ण- 39*    *उपचार घेऊन बरे झालेले रुग्ण- 36*   *मृत्यू झालेले रुग्ण-2*

मॉर्निंग न्यूज :- लातुर जिल्हयात 2 पॉझिटीव्ह व 6 अहवाल प्रलंबित

Image
    दि.22 मे 2020   - : Latur district : - total    ------------------  73 active cases----------  35 discharge--------------  36 death -------------------- 02       लातुर जिल्हयातील 2 पॉझिटीव्ह व 6 प्रलंबित ( उदगीर  1,  लातूर - लेबर कॉलोनी 1 )   लातूर, दि.22:- विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 21.05.2020 रोजी लातूर जिल्ह्यातील एकुण 95 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी या संस्थेतील 29 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते व त्यातील 27 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन एका  व्यक्तींचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे व एका व्यक्तींचा अहवाल प्रलंबित आहे. पॉझिटीव्ह अहवाल आलेला व्यक्ती 65 वर्षाचा असुन तो नाकाच्या ऑपरेशनसाठी या रुग्णालयात दाखल झाला होता. ऑपरेशन करण्यापूर्वी त्या व्यक्तीला होल्डींग वार्ड मध्ये ठेवून त्याचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्याच्यावर उपचार सुरु असुन त्याची प्रकृती स्थित आहे. तो मागील 8 दिवसापूर्वी बिदर येथुन आला असुन सदर व्यक्ती...

हिंगोलीत आणखी सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर

Image
हिंगोलीत आणखी सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर रुग्ण संख्या पोहचली १८ वर   हिंगोली - मुंबई वरून जिल्ह्यात परतलेल्या सहा कामगारांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल शनिवारी प्राप्त झाला असून आणखी त्यात सहा रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोना बंधितांची संख्या १८ वर गेली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली.   मागील चार दिवसापूर्वी मुंबई वरून गावी  परतलेल्या ४५ वर्षीय एका पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याने त्याला औंढा येथील कोविड केअर सेंटर येथे भरती करून उपचार सुरु केले आहेत. तर इतर पाच रुग्ण वसमत येथील कोविड केअर सेंटर येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे पाच जण मुंबई येथून कनेन्ट मेन्ट झोन मधून आल्यानेच त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचा दावा वैद्यकीय अधिकारी यानी अहवाल अंती सांगितले. या सर्वांची प्रकृती ठणठणीत असून,त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून येत नाहीत.   जिल्ह्यात आतापर्यन्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांने शतक गाठले होते. परंतु जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल,जिल्हा परिष...