Posts

Showing posts from May 21, 2020

औंढ्यात एका २८ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण 

Image
  औंढ्यात एका २८ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण    रुग्ण संख्या पोहचली ११वर   हिंगोली -  मुंबई येथून (ता.१८) औंढा तालुक्यात परतलेल्या एका २८ वर्षीय  पुरुषाला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल गुरुवारी प्राप्त झाला असून त्याला औंढा येथीलकोरोना सेंटर मध्ये भरती करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे नसल्याचे अहवालावरून  दिसून आले आहे.   जिल्ह्यात आतापर्यंत १०१ रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी ९० रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. सद्य स्थितीला जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ११ वर पोहचली आहे. दरम्यान औरंगाबाद येथे भरती केलेल्या सात पैकी सहा जवानांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यां जवानांना सुट्टी देण्यात आली आहे. आता जिल्ह्यात११ कोरोना बाधितांची संख्या११ वर पोहचली आहे.          

56 दिवसानंतर लाल परी धावणार

Image
       56 दिवसानंतर लाल परी धावणार अटीशर्तींच्या अधीन राहून  एसटी महामंडळाला केवळ  जिल्ह्यांतर्गत (जिल्ह्याच्या सीमेपर्यंतच) एसटी बस सेवा सुरू करण्याची परवानगी  लातूर येथील फक्त बसस्थानक क्रं.2 वरून बसेस सुटणार असून कालच संपूर्ण बस स्थानक महानगर पालिकेच्या सहकार्याने सॅनिटायझर करून घटल्याचे बसस्थानक प्रमुख हनुमंत चपटे यांनी सांगितले  मुंबई, दि. २१ – कोरोना महामारीचा फैलाव  रोखण्याच्या दृष्टीने राज्यशासनने दिलेल्या निर्देशानुसार रेड झोन व कंटेंनमेंट झोन वगळता राज्यातील इतर विभागामध्ये काही अटीशर्तींच्या अधीन राहून उद्या दि. २२ मे  पासून  जिल्हा-अंतर्गत एसटी बससेवा सुरु होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड.अनिल परब यांनी दिली. ते पुढे म्हणाले की,  २३ मार्च पासून गेले दोन महिने मुंबई व उपनगरात अत्यावश्यक सेवा वगळता एसटी बस सेवा संपूर्ण महाराष्ट्रात बंद आहे. परंतु लॉकडाऊनच्या चौथ्या कालखंडामध्ये राज्यशासनाने  रेड झोन व कंटेंनमेंट झोन...

हिंगोली -तब्बल ५५ दिवसानंतर जिल्ह्यात आजपासून लाल परीची चाके फिरणार 

Image
  तब्बल ५५ दिवसानंतर जिल्ह्यात आजपासून लाल परीची चाके फिरणार    विभागीय नियंत्रक मुक्तेश्वर जोशी यांची माहिती   हिंगोली -  कोरोना संसर्ग मुळे संपूर्ण राज्यात लॉकडाऊन केल्यामुळे लाल परीची रेल्वे सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे  आगाराला एक कोटीचा फटका बसला असून आता शुक्रवार पासून तब्बल ५५ दिवसानंतर जिल्हानंतर्गत तालुका टू तालुका बसेस धावणार असल्याची माहिती विभागीय नियंत्रक मुक्तेश्वर जोशी यांनी दिली.   कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊन, संचारबंदी काळात बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे गेली दीड महिन्यापासून जिल्ह्यातील पाच ही आगारातील वाहतूक सेवा ठप्प झाल्याने आगाराला एक कोटीचा फटका बसला आहे. जिल्ह्यात केवळ १५ कोरोना बाधितरुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हानंतर्गत बस सेवा सुरू करण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी यांची परवानगी घेण्यासाठी गुरुवारी परभणी आगाराचे विभागीय नियंत्रक मुक्तेश्वर जोशी ,आगार प्रमुख चौतमल ,वाहतूक नियंत्रक दसपुते ,नगराळे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांची भेट घेऊन पत्र...

उदगीर- 1, रेणापूर -1,  निलंगा  2,  लातूर - बोरगाव -1, ( एकूण 5 ) अहवाल पॉझिटीव्ह

Image
उदगीर- 1, रेणापूर -1,  निलंगा  2,  लातूर - बोरगाव -1, ( एकूण लातूर 5 ) अहवाल पॉझिटीव्ह   लातूर जिल्ह्यात आज 5 पॉझिटीव्ह अहवाल आले असुन या मध्ये पानगाव ता.रेणापूर येथील 1, काळे बोरगाव 1, चिमाचीवाडी ता.उदगीर 1, कोराळी ता.निलंगा 1, व लांबोटा ता.निलंगा असे एकूण 5 रूग्ण पॉझेटिव्ह अढळून आले आहेत. हे सर्व रूग्न मुबंई येथून प्रवास करून आलेले आहेत.        - : Latur district : - total    ------------------  71 active cases----------  33 discharge--------------  36 death -------------------- 02      

आंबाळा शिवारात एकाची गळफास घेवून आत्‍महत्या

Image
  आंबाळा शिवारात एकाची गळफास घेवून आत्‍महत्या   हिंगोली -  वसमत तालुक्‍यातील कुरुंदा पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या आंबाळा शिवारात एकाने कोरोनामुळे कामधंदा नसल्याने नैराशातून आत्‍महत्या केल्याची घटना घडली असून या बाबत कुरुंदा पोलिस ठाण्यात बुधवारी (ता.20) आकस्‍मात मृत्‍यूची नोंद झाली आहे.    या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुरुंदा पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या आंबाळा शिवारात साहेबराव मुंजाजी भाकरे (वय 50) राहणार चोंढी बहीरोबा ता. वसमत जि. हिंगाली या मजुराने मंगळवारी (ता.19) दुपारच्या वेळी लॉकडाऊनमुळे कामधंदा नसल्याने नैराश्यातून आंबाळा शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्‍महत्या केली आहे. या बाबत  विजय साहेबराव भाकरे यांनी कुरुंदा पोलिस ठाण्यात बुधवारी तोंडी खबर दिल्यावरून आकस्‍मात मृत्‍युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत  

हिंगोली - औरंगाबाद येथे भरती असलेले पाच जवान कोरोनामुक्त

Image
हिंगोली - औरंगाबाद येथे भरती असलेले पाच जवान कोरोनामुक्त   पॉझिटिव्ह रुग्णांची निगेटिव्ह कडे वाटचाल , जिल्हा प्रशासनाला यश   हिंगोली - कोरोनाची लागण झालेल्या सात  जवानांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना औरंगाबाद येथे भरती करण्यात आले होते. त्यापैकी गुरुवारी पाच जवानांचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून आता केवळ दहा रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण संख्या कमी होत असल्याने जिल्हा प्रशासनाला यश आले आहे.   जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा आरोग्य यंत्रणेच्या चुकी मुळे शंभराच्यावर गेला होता. मुंबई मालेगाव येथून परतलेल्या कोरोना संक्रमित जवानांना एकाच कक्षात ठेवल्याने कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सामान्य रुग्णालयातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. त्यानंतर रुग्णालयाची यंत्रणा हलली.आणि प्रशासन जागे झाले. एकूण कोरोना रुग्ण संख्या १०० वर पोहचली होती. यापैकी ९० रुग्ण बरे होऊन घरी परतल्याने आजघडीला केवळ दहा रुग्ण संख्या कमी झाल्याने ग्राफ देखील घसरत चालला आहे.   औरंगाबाद येथे सहा...

माथा येथे मित्रानेच केला मित्राचा चाकूने भोसकुन खुन 

Image
  माथा येथे मित्रानेच केला मित्राचा चाकूने भोसकुन खुन    वडिलांना शिवीगाळ केल्याचे कारण   औंढा नागनाथ -   तालुक्यातील माथा येथे वडिलांना शिवीगाळ केल्याच्या कारणावरून मित्रानेच मित्राचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना घडली असून या प्रकरणी गुरुवारी  औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला असून एकाला अटक करण्यात आली आहे तर तीघेजण फरार झाले.     पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ  तालुक्यातील माथा येथे माधव पांडूरंग पोले (वय 22) याचे त्याचा मित्र दिनेश उर्फ दगडू मोळंके याचे वडिल भानुदास मोळंके यांच्या सोबत दोन दिवसांपुर्वी भांडण झाले होते. यावेळी माधव याने भानुदास मोळंके यांना शिवीगाळ केली होती. त्याचा राग दिनेशच्या मनात होता. बुधवारी (ता.20) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दिनेश याने माधव पोले याच्या घरी जाऊन त्यास बाहेर बोलावले. त्यानंतर घराजवळच असलेल्या इतर तिघांनी माधव पोले याचे हातपाय धरले तर दिनेश मोळंके याने धारदार चाकूने त्याच्या छातीवर डाव्या बरगडीवर, डाव्या हाताच्या दंडावर वार करून गंभीर जखमी केले. यात माधव ...

लातूर जिल्यातील एकूण रुग्णाची संख्या 28 वर

Image