Posts

Showing posts from May 17, 2020

लातूर 2, उदगीर 3, तर जळकोट 1, बीड 7, उस्मानाबाद 3 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह

Image
लातूर 2, उदगीर 3 तर जळकोट 1, बीड 7, उस्मानाबाद 3 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह   Latur district total 55 active cases 25 discharge 29 death 2   विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज एकुण 78 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 11 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले असून त्यापैकी 2 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून ते दोघेही मुंबई येथून प्रवास करून आलेले व्यक्ती आहेत व 09 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.  उप जिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 9 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते  त्यापैकी 6 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 3 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.   जळकोट येथील एका व्यक्तींचे स्वॅब तपाणीसाठी आला होता त्या व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे . बीड येथील 29 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्या 22 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून 7 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व उस्मानाबाद येथील 28 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 25 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असु...

कर्तव्यात कसुर करणारा कंत्राटी वैद्यकिय अधिकारी सेवामुक्त

कर्तव्यात कसुर करणारा कंत्राटी वैद्यकिय अधिकारी सेवामुक्त जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सकानी काढले आदेश ,कामचुकार पणा भोवला हिंगोली -   येथील जिल्‍हा सामान्य रुग्णालयात एनसीडी कार्यक्रमातंर्गत कंत्राटी वैद्यकिय अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्‍यांना जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी शुक्रवारी (ता.15) दिलेल्या पत्राद्वारे कायमस्‍वरुपी सेवामुक्‍त केले आहे.   येथील जिल्‍हा सामान्य रुग्णालयातील एनसीडी कार्यक्रमातंर्गत असलेले कंत्राटी वैद्यकिय अधिकारी डॉ. अजय कदम यांना दिलेल्या नियुक्‍ती आदेशाच्या कराराप्रमाणे कार्यालयीन वेळेनुसार कार्यालयात हजर राहून दिलेल्या जबाबदारी प्रमाणे राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रम, कर्करोग, मधुमेह, ऱ्हदयरोग व पक्षाघात प्रतिबंधक या कार्यक्रमातंर्गत कामकाज करणे आवश्यक होते. परंतू या कार्यालयाकडून वारंवार लेखी सुचना देऊनही ते विना परवानगी अनाधिकृत गैरहजर राहत असल्याने राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम (एनसीडी) वर परिणाम होत आहे.   त्‍यामुळे या आपल्या गैरहजेरी बाबत कार्यक्रमाची आवश्यकता लक्षात घेता ...

प्रवाश्यांना इंस्टिट्यूशनल क्वारंटाईन करून तपासणी करावी 

प्रवाश्यांना इंस्टिट्यूशनल क्वारंटाईन करून तपासणी करावी  जिल्हा शल्यचिकित्सकाचे वैद्यकीय अधिकाऱ्याना आदेश हिंगोली - मुंबई सारख्या कनेन्टमेन्ट झोन मधून कोरोना बाधित रुग्ण मोठ्या संख्येने येत आहेत. त्यामुळे त्यांची इंस्टिट्यूशनल क्वारंटाइन कक्षात ठेवून तपासणी करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीवास यांनी वैद्यकीय अधिकारी यांना रविवारी पत्रा द्वारे दिले आहेत. मुंबई येथून वसमत मध्ये दाखल झालेल्या आठ मजुरांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्याची कोरोना पॉझिटिव्ह संख्या १५ वर गेली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा  शल्यचिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी ,प्राथमिक आरोग्य अधिकारी यांना खरमरीत पत्र पाठवले आहे.यात ते म्हणाले की, मुंबई येथून येणाऱ्या प्रवाश्याना कोरोनाची लागण असण्याची श्यक्यता नाकारता येत नाही त्यामुळे याबतीत व्यक्तिशः लक्ष देऊन काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मुंबई सारख्या ठिकाणावरून येणाऱ्या सर्व प्रवाश्याना इंस्टिट्यूशनल क्वारंटाइन करून त्यांचे थ्रोट स्वा...

बियर, वाईन पेक्षा तळीरामांचा देशी कडे कल 

बियर, वाईन पेक्षा तळीरामांचा देशी कडे कल  दोन दिवसात तब्बल ३७ हजार बल्क लिटर दारूची विक्री हिंगोली - जिल्हा प्रशासनाने दारू विक्रीसाठी परवानगी दिल्याने दोन दिवसात सुमारे ३७ हजार ३५७ बल्क लिटर मद्याची विक्री झाली असून तळी रामांचा कल हा देशी दारुकडे असल्याचा आकडेवारी वरून दिसून येते. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशभरासह जिल्ह्यात २२ मार्च पासून लॉकडाऊन करण्यात आल्याने केवळ अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा गर्दी टाळण्यासाठी बंद केल्या होत्या.दोन मे ते सतरा मे या तिसऱ्या लॉकडाऊन मध्ये शासनाने मद्य विक्री सुरू करण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी परिस्थिती पाहून गुरुवारी, व शुक्रवारी असे एक दिवसाआड दारू विक्रीस परवानगी दिली होती .त्यानुसार जिल्ह्यात ४१ देशी दारू दुकाने, तीन विदेशी तर ४२ बियर दुकानातून मद्याची विक्री झाली आहे. देशी मद्य विक्री दुकानातून दोन दिवसात २७हजार ६९५ बल्क लिटर तर विदेशी मद्यविक्री दुकानातून १२२२ तर ८०७० बियरची विक्री झाली आहे.एकूण ३७ हजार २५७ बल्क लिटर दारूची विक्री झाल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक केशव राऊत यांनी ...

उदगीर : कोरोना पॉझिटिव असलेल्या एका 65 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू 

Image
* उदगीर कोरोना अपडेट* उदगीर उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोना पॉझिटिव असलेल्या एका 65 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू  उदगीर उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोना पॉझिटिव असलेल्या एका 65 वर्षीय पुरुष रुग्णाचा आज दुपारी 12 वाजून 45 मिनिटांनी मृत्यू झालेला आहे.  या रुग्णास हायपरटेन्शन व मधुमेह हे ही आजार होते, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय ढगे यांनी दिली आहे.           

हिंगोली : मुंबईहून वसमत येथे परतलेल्या ८ जणांना कोरोनाची बाधा

Image
मुंबईहून वसमत येथे परतलेल्या ८ जणांना कोरोनाची बाधा  ग्रीन झोन इज कणव्हरटेट इनटू रेड झोन,रुग्ण संख्या गेली १५ वर , हिंगोली -  मुंबई-पुणे आदी कोरोना रोगाच्या हॉटस्पॉट भागातून मजूर आपल्या गावाकडे परत येत आहेत. अशाच एका घटनेत मुंबई येथून वसमत येथे आलेल्या ८ जणांना कोरोनाची लागण झाल्याच्या अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आल्याने आता एकूण रुग्ण संख्या १५ वर गेली आहे.त्यामुळे ग्रीन झोन असलेला जिल्हा आता रेड झोन मध्ये पुन्हा कणव्हर्ट होत असल्याने जिल्हा प्रशासनाची धाकधूक वाढली आहे. मुंबई वरून कामगार वसमत येथे परतल्याने त्या आठ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने वसमत तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.  प्रशासनाने सदर रुग्णांना वसमत तालुक्यात येताच विलगी करण केल्यामुळे हे रुग्ण इतरांमध्ये मिसळले नाहीत आणि त्यामुळे मोठा धोका टळला आहे. हिंगोली जिल्हा हा कोरोनामुक्त दिशेने वाटचाल करीत असताना पुन्हा आणखी वसमत येथे ८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला आणखी कॉन्ट्रोल करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून बाहेरून आलेल्या प्रत्येक नागरिकाची नोंद ...