सुखद बातमी; एसआरपीएफचे ३३ जवान कोरोनामुक्त
सुखद बातमी; एसआरपीएफचे ३३ जवान कोरोनामुक्त कोरोना बाधितांचा आलेख घसरल्याने ,जिल्हा प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला हिंगोली - सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डातील ३२ एसआरपीएफ जवान व एक परिचारिका यांचा अहवाल शुक्रवारी निगेटिव्ह आल्याने एकूण ३३ रुग्णांना सुट्टी देण्यात आल्याने कोरोना बाधितांचा आलेख घसरल्याने जिल्हा प्रशासनाने सुटकेचा मोकळा श्वास घेतल्याने जिल्ह्याची ग्रीन झोन कडे वाटचाल सुरु आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या ९१ गेल्याने हिंगोली जिल्हा महाराष्ट्रात रेड झोन मध्ये गेल्याची नोंद झाली होती. यातील ८१ रुग्ण ठणठणीत झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली.आजघडीला केवळ दहा रुग्ण पॉझिटिव्ह आहेत.त्यामुळे जिल्ह्याचा वाढलेला आलेख आता घसरत चालल्याने जिल्हा प्रशासनाने सुटकेचा मोकळा श्वास घेतला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसो लेशन वॉर्डातील ३२ राज्य राखीव दलाचे जवान व एक परिचारिका असे एकूण मिळून ३३ रुग्णांचा अहवाल शुक्रवारी निगेटिव्ह प्राप्त झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. मालेगाव, मुंबई येथे बंदोबस्तावरून परतलेल्या दहा जवान...