Posts

Showing posts from May 14, 2020

हिंगोलीत एसआरपीएफच्या दोन जवानाना सुट्टी

Image
हिंगोलीत एसआरपीएफच्या दोन जवानाना सुट्टी  आता ४३ रुग्णावर उपचार   हिंगोली - येथील जिल्‍हा सामान्य रुग्णायातील आयसोलेशन वार्डातून दोन एसआरपीएफ जवांनाना गुरूवारी (ता.14) सुट्टी देण्यात आली आहे. यात हिंगोली येथील एक जवान व जालना येथील एका जवानाचा समावेश असल्याची माहिती जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. किशोरप्राद श्रीवास यांनी दिली.   आजपर्यत जिल्‍ह्‍यात कोविड-19 चे 91 रुग्ण होते यापैकी 48 रुग्ण बरे झाल्याने त्‍यांना डिस्‍चार्ज देण्यात आला आहे. व सध्या 43 रुग्ण पॉझीटीव्ह आहेत. जिल्‍हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डातून दोन एसआरपीएफ जवानाना सुट्टी देण्यात आली आहे. यात एक जवान एसआरपीएफ हिंगोली व एक जवान जालना एसआरपीएफचा आहे.   आता एकूण 42 बाधीत एसआरपीएफ जवान हे उपचारसाठी हिंगोली येथे भरती झालेले आहेत.  उर्वरित एक रुग्ण जिल्‍हा रुग्णालयातील परिचारीका आहे. जिल्‍हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात जे रुग्ण भरती आहेत त्‍यांची प्रकृती स्‍थीर असून सद्यस्‍थितीत कोणतीही गंभीर लक्षणे नाहीत. उर्वरित नऊ एसआरपीएफ जवान औरंगाबाद येथील धुत हॉस्‍पीटल येथे भरती आहेत.  आत...

उदगीर येथे आज एकही रुग्ण नाही तर कळंब येथे 3 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह

Image
उदगीर येथे आज एकही रुग्ण नाही तर कळंब येथे 3 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आज गुरुवार वार,  दिनांक  14 मे 2020 पर्यंत      उदगीर चे 17 कोरोना रुग्ण  (+Ve)      होम क्वारंटाइन   :-  11         एकूण  :-    28      मृत --- 1       लातूर रि पोर्ट येणे बाकी -- 1 (प्रलंबित )  विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज एकुण 58 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 22  व्यक्तींच्या  स्वॅबची तपासणी करण्यात आली त्यापैकी 21 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 1 व्यक्तीचा अहवाल (Inconclusive) आला असल्यामुळे त्याची उद्या पुनर्तपासणी करण्यात येणार आहे.  उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथील 3  व्यक्तींच्या  स्वॅबची तपासणी करण्यात आली त्यापैकी सर्वच व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बीड  येथील 15 व्यक्तींच्या  स्वॅबची तपासणी करण्यात आली त्यापैकी 14 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आ...

हिंगोलीत तब्बल ५१ दिवसांनी दारूची दुकाने उघडली

Image
  हिंगोलीत तब्बल ५१ दिवसांनी दारूची दुकाने उघडली तळीरामांची  दारू नेण्यासाठी वाईन शॉपवर गर्दी ,परवाना धारकानाच प्राधान्य हिंगोली- जिल्ह्यात तब्बल दीड  महिन्यानंतर गुरुवारी (ता.१४)दारू दुकान उघडल्याने तळीरामांनी दारू खरेदीसाठी शहरातील रामलीला मैदाना लगत असलेल्या वाईन शॉपवर एकच गर्दी केली होती. मात्र परवानाधारक असेल तरच  मद्य देणार असल्याचे विक्रेत्याने सांगितल्याने ज्यांच्याकडे परवाना नाही अश्या मद्यपीना आल्या पावली माघारी फिरण्याची वेळ आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊन नंतर  हिंगोलीत तब्बल५१ दिवसानंतर पहिल्यांदाच मद्य विक्रीची दुकाने एक दिवसाआड उघडण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत. त्यानुसार गुरुवारी दुकाने उघडल्याने तळीरामानी दारू खरेदी करण्यासाठी सकाळच्या सुमारास गर्दी करीत असल्याचे फोटो व्हाट्सऍप वर व्हारल होताच गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी दुकान मालकांना दूरध्वनी करून सांगताच दहा मिनिटे पुन्हा दुकान बंद केले होते. त्यानंतर काही दारुड्यानी परवाना धारकांनाच द्या असे म्हणत थोडा वेळ गोंधळ घातला होता. ब...