उदगीर येथील ११ रुग्णांची कोविडवर मात *रुगणालयातुन सुटटी मिळणार...
उदगीर येथील ११ रुग्णांची कोविडवर मात *रुगणालयातुन सुटटी मिळणार, होम क्वॉरटाईनमध्ये ठेवणार - पालकमंत्री अमित देशमुख लातूर, दि.11:- उदगीर येथील कोविड १९ रुग्णालयात उपचार घेत असलेल्या २७ कोविड रुग्णांपैकी ११ जणांची प्रकृती उत्तम असुन त्यांना रूग्णालयातुन सुटटी देण्यात येत असल्याची माहिती, राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतीक कार्यमंत्री तथा लातूर जिल्हाचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे. या संदर्भाने माहिती देताना पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले की, उदगीर शहर वगळता संपूर्ण लातूर जिल्हा सदया कोविड १९ मुक्त आहे. उदगीर येथे एका महिलेस कोविड १९ ची लागण झाल्याचे निर्दशनास आले. त्यात त्यांचा मृत्युही झाला. त्यानंतर संबंधित कुटुंब परीरसरातील नागरीकांची तपासणी केली असता आज पर्यत एकूण २७ रुग्ण आढळून आले आहेत. उदगीर येथील कोविड १९ रुग्णालयात त्यांच्यावर...