उदगीर मध्ये तीन दिवसांमध्ये रेडझोन भागात अधिक कडक बंदोबस्त
उदगीर (संगम पटवारी) : शहरात कोरोनाच्या संसर्गजन्य परिस्थिती च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी (ता.१०) पर्याय संचारबंदीचे आदेश लागू केले होते. सोमवारपासून (ता.११) एक आठवडा अत्यावश्यक सेवेसह कृषीसेवा केंद्र सुरु करण्यासाठी आता परवानगी देण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी दिली.  शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे व रेड झोनमधील नागरिक बाजारपेठेत दाखल होत असल्याने कोरोनाचा संसर्गाचा धोका वाढला होता. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारपासून (ता.८) तीन दिवस संचारबंदी लागू केली होती. उदगीर शहरासह शहराअंतर्गत असलेल्या ग्रामीण भागातील वस्तीमध्ये संचार बंदीचे आदेश निर्गमित केले होते. या तीन दिवसांमध्ये रेडझोन भागात अधिक कडक बंदोबस्त लावून जाण्याचे मार्ग काटेरी कुंपणाने सील करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रभाव थोडासा कमी झाल्याने पुन्हा सोमवारपासून (ता.११) कृषीसेवा केंद्रासह अत्यावश्यक सेवेला सकाळी सात ते बारापर्यंत दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे या आदेशानुसार या संचारबंदीच्या काळात फक्त शासकीय कार्यालय, त्यांचे कर्मचारी, त्यांची वाहने, ...