Posts

Showing posts from May 9, 2020

शुभ दिन -- उदगीर सह लातूर जिल्ह्यात आज कोरोना चा एकही रुग्ण नाही 

Image
शुभरात्री 10.10 रिपोर्ट उदगीर सह लातूर जिल्ह्यात आज कोरोना चा एकही रुग्ण नाही        आज दिनांक 09 मे 2020 पर्यंत     उदगीर चे 22 कोरोना रुग्ण (+Ve)      मृत --- 1       रि पोर्ट येणे बाकी -- 2 (प्रलंबित )  विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज एकुण 50 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 19 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 17 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन दोन व्यक्तीचे अहवाल प्रलंबित आहेत.  विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 3, स्त्री रुग्णालय लातुर 1, अहमदपुर 1,  बीड 16, अंबाजोगाई 5, परळी 2,  उस्मानाबाद 3, व असे एकुण 50 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी 48 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन दोन व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत, अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.   सद्यस्थितीत लातुर शहरात  कोरोना (...

जादा फिस अकारणाऱ्या शाळांवर कारवाई जादा फिस अकारणाऱ्या शाळांवर कारवाई करणार - शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड

Image
जादा फिस अकारणाऱ्या शाळांवर कारवाई जादा फिस अकारणाऱ्या शाळांवर कारवाई करणार शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड हिंगोली - कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन कारण्यात आल्याने सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यातच पालकांची परिस्थिती बेताची झाली आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षात शाळांनी फिस वाढविल्यास कारवाई करण्याचा इशारा शनिवारी (ता.९) शालेय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याच्या पालक मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दिला आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ८८ वर गेली आहे.त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काय उपाय योजना केल्या आहेत. याचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्या पत्रकारांशी बोलत होत्या . यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी ,पोलीस अधीक्षक योगेशकुमार जिल्हा परिषदेचे सीईओ राधा बिनोद शर्मा, जिल्हा शालीचकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार , उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे , अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिलिंद पोहरे ,माध्यमिक शिक्षणाधिकारी पी. बी. पावसे, प्राथमिक शिक्षणाधिकारी संदीप कुमार सोनट...

आजपासून दिवसाआड जीवनावश्यक वस्‍तूची होणार विक्री

Image
आजपासून दिवसाआड जीवनावश्यक वस्‍तूची होणार विक्री जिल्‍हाधिकारी यांचे नव्याने आदेश हिंगोली -  जिल्‍ह्‍यात रविवारपासून (ता.१०) एक दिवसाआड भाजीपाल्यासह जिवनावश्यक वस्‍तू विक्रीची दुकाने सुरू राहणार असल्याचे नवीन आदेश जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले असून आता पुर्वीच्या सकाळी नऊ ते एक यावेळे ऐवजी आठ ते एक यावेळात ते सुरू राहणार आहेत.  कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यापुर्वी किराणा माल विक्री करणारे दुकाने भाजीपाला विक्री सुरू करण्याचा सुचना निर्गमीत करण्यात आल्या होत्या. त्‍यानुसार किराणा, भाजीपाला, दुध विक्री केंद्र, परवाना असलेले चिकन, मटन शॉप, बेकरी, स्‍वीटमार्ट, संबधीत दुकाने सकाळी नऊ ते एक या वेळात सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. आता यात नव्याने बदल करून या दुकानाची वेळ सकाळी आठ ते एक अशी करण्यात आली असून नगरपरिषदेने ठरवून दिलेल्या जागेवर भाजीपाला विक्री केली जाणार आहे.  दरम्‍यान, एक दिवसाआड भाजीपाला व जीवनावश्यक वस्‍तू  विक्रीची दुकाने रविवार (ता.10). मंगळवार (ता.12), गुरूवार (ता.14) व शनिवार (ता.16) सकाळी आठ ते एक या वेळात सुरू राहणार असल्याचे आदेश जिल्‍हाध...