Posts

Showing posts from May 8, 2020

दिलासादायक बातमी :- हिंगोली एसआरपीएफचे दोन जवान कोरोनामुक्त

Image
एसआरपीएफचे दोन जवान कोरोनामुक्त बेरजेचे वजाबाकीत रूपांतर झाल्याने जिल्हा प्रशासनाला दिलासा हिंगोली - येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ८४ कोरोनाबाधित रुग्णांपैकी दोन जवानांचा १४ व १५ दिवसांनंतरचा थ्रोट स्वॅब अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना शुक्रवारी (ता. आठ) रुग्णालयातून सुटी देण्यात आली.त्यामुळे सातत्याने होत असलेल्या बेरजेचे आता वजाबाकीत रूपांतर झाल्याने जिल्हा प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यातील पहिला कोरोनाधित आढळलेल्या रुग्णाचे १४ व १५ दिवसांनंतरचा थ्रोट स्वॅब निगेटिव्ह आल्याने त्याला कोरोनामुक्त करण्यात आले. तसेच रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. दरम्यान, त्यानंतर तब्बल ९० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यासर्व रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात एसआरपीएफच्या ८४ जवानांचा समावेश आहे. शुक्रवारी यातील दोन जवानांचे १४ व १५ दिवसांनंतर घेतलेले थ्रोट स्वॅब अहवाल सायंकाळी निगेटिव्ह आले. त्यामुळे दोन जवान कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डॉक्टरांच्या उपस्थितीत रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सध्या एसआरपीएफचे ८२ जवानांसह सेनगाव येथी...

उदगीर :- आज 1 रुग्णाची वाढ कोरोना रुग्णाची एकूण संख्या 22 वर 

Image
उदगीर मध्ये  आज 1 रुग्णाची वाढ कोरोना रुग्णाची संख्या 22 वर  विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज एकुण 57 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 28 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्या पैकी एका व्यक्तींचा अहवाल पॉझिटीव्ह आला असुन एका व्यक्तीचा अहवाल (Inconclusive) आला असल्यामुळे त्याची 48 तासानंतर पुनर्तपासणी करण्यात येणार आहे व उर्वरीत २६ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.  बीड 9, उस्मानाबाद 7, निलंगा 4 व विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ९ असे एकुण 29 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले  होते त्यापैकी सर्वच 29 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.   या संस्थेस सामुदायिक दसरा महोत्सव समिती व ट्रेडर्स असोसिएशन कृषी खात्याच्या वतीने 107 पी. पी. ई. कीटस् व ४० लिटर हॅण्ड सॅनिटायझर्स Donate केले यावेळी, श्री. प्रकाश पाटील वांजरखेडकर, श्री. निजाम शेख, श्री. व्यक...

बँकेच्या पाच शाखा व्यवस्थापकाना प्रत्येकी दोन हजाराचा दंड

बँकेच्या पाच शाखा व्यवस्थापकाना प्रत्येकी दोन हजाराचा दंड सोशल डिस्टन्स राखणे पडले महागात हिंगोली - शहरातील पाच बँकेत व्यवहार करण्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्सचे पालन न करता मोठी गर्दी केल्याचा ठपका ठेवत पालिका कर्मचाऱ्यांनी पाच बँक व्यवस्थापकांना प्रत्येकी दोन हजाराचा दंड वसूल केला.  शहरात राज्य राखीव दलाच्या जवाना पाठोपाठ शहरातील रिसाला बाजार भागातील एका सामान्य रुग्णालयात काम करणाऱ्या परीचारिकेला कोरोना ची लागण झाल्याने संपूर्ण परिसर सील करून एक दिवसाआड अत्यावश्यक आस्थापना सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले होते. त्यानुसार शुक्रवारी (ता.८) किराणा, मेडिकल, भाजीपाला मार्केट यासह कृषी, कृषी यंत्रे, बँका देखील उघडण्यात आल्या होत्या.  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी जयवंशी यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून,दुकान, बँका ,मेडिकल आदी ठिकाणी सोशल डिस्टन्सचे पालन करून व्यवहार करण्याचे आदेश सर्व बँक व्यवस्थापकांना दिले होते. शिवाय बँकेत गर्दी होणार नाही यासाठी बँकेसमोर लाईन मध्ये उभे राहण्यासाठी मंडप टाकण्याच्या सूचना दिल्या असताना काही ब...

रुग्णालयात दहशत घालणाऱ्या जवानांचा बंदोबस्त करा

Image
रुग्णालयात दहशत घालणाऱ्या जवानांचा बंदोबस्त करा जिल्हा शल्यचिकित्सकाची  एसआरपीएफ समदेशकाकडे तक्रार हिंगोली - येथील जिल्हा रुग्णालयात  उपचार घेत असलेले कोरोनाबाधित जवान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये दहशत घालणाऱ्या त्या जवानांचा तात्काळ बंदोबस्त केल्यास उपचार करता येथील अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी लेखी पत्राद्वारे राज्य राखीव दलाच्या समदेशकाकडे तक्रार केली आहे. आता समदेशक गोंधळ घालणाऱ्या जवानांवर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्य राखीव दलाच्या समदेशकाकडे केलेल्या तक्रार निवेदनात नमूद केले की,आपल्या अधिनस्त असलेल्या मालेगाव, मुंबई येथून बंदोबस्तावरून परतलेल्या जवानांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर आयसोलेशन वॉर्डात भरती केलेल्या जवानांवर उपचार सुरू आहेत. भरती केलेले जवान बेडवर न थांबता वॉर्डात व रुग्णालयाच्या गच्चीवर बिनधास्त पणे मुक्त संचार करीत असल्याचे व्हिडीओ क्लिप द्वारे निदर्शनास आले असल्याचे सांगून ती व्हायरल झाल्याने रुग्णालय परिसरातील वास्तव्यास असलेल्या कुटूंबियात भीतीचे वातावरण पस...