Posts

Showing posts from May 5, 2020

उदगीरच्या एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह , एकूण 14 +Ve

Image
उदगीरच्या एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आला, एकूण 14 +Ve संगम पटवारी :- लातुर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 05.05.2020 रोजी सकाळी 8.00 ते दु 4.00 पर्यंत कोरोना (कोविड-19) बाहयरुग्ण विभागात एकुण 65 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. आजपर्यंत एकुण 230 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली होती.  त्यापैकी 222 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आलेले असुन यापूर्वीच दिनांक 04.04.2020 रोजी 8 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले होते ते रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना या रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे.  आजपर्यंत 200 व्यक्तींचा Home Quarantine  कालावधी समाप्त झाला असुन एकुण 20 व्यक्तींना जिल्हा आरोग्य विभागामार्फत Home Quarantine मध्ये निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. तसेच 10 व्यक्तींना Institutional Quarantine मध्ये ठेवण्यात आले आहे अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्ष प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक औषधवैद्यकशास्त्र विभाग डॉ. मारुती कराळे यांनी दिली.  विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज एकुण 17 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी उपजिल...

हिंगोली रुग्ण संख्या पोहचली 89 वर , शतकाकडे वाटचाल

Image
खळबळ ;  हिंगोलीत पुन्हा नव्याने १४ एसआरपीएफ जवान कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या पोहचली 89 वर ,शतकाकडे वाटचाल हिंगोली - मालेगाव व मुंबई येथून बंदोबस्तवरून  परतलेल्या पुन्हा नव्याने १४ जवानांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मंगळवारी सकाळी बाराच्या सुमारास प्राप्त झाला असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.यामुळे एकूण ८२ व जालना येथील एक जवान अश्या एकूण ८३ जवानांना कोरोनाचीलागण झाली आहे .आतापर्यन्त सुमारे ८९ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे प्राप्त आकडेवारीवरून स्पस्ट झाले आहे.त्यामुळे जिल्ह्याची कोरोना बाधितांची संख्या शतकाकडे वाटचाल करीत  आहे. सोमवारी रात्री बाराच्या सुमारास प्राप्त अहवाला नुसार २३ जवान व   सामान्य रुग्णालयातील एका परीचारिकेला  असे मिळून सुमारे  २४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे  समोर आले असतानाच पुन्हा मंगळवारी त्यात १४ जवानांची भर पडल्याने कोरोना पॉझिटिव्ह मध्ये वाढ होऊन आता ती ८९ एवढी झाली आहे. मुंबई ,जालना येथून कर्तव्य बजावून परतलेल्या १९४ जवान हिंगोलीत दाखल झाल्यानंतर त्यांना १४ दिवस राज्य राखीव दलाच्या एका हॉल मध्ये क्वारंटाइन करण्यात आले हो...

दारू दुकाने बंद, लातूर जिल्यातील दारू दुकाने आज पासून पुन्हा बंद

Image
दारू दुकाने बंद, लातूर जिल्यातील दारू दुकाने आज पासून पुन्हा बंद रेड झोन, ऑरेंज व ग्रीन झोन मध्ये दारू दुकाने चालू करण्यासाठी लातूर जिल्ह्यात परवानगी देण्यात आली होती परंतु मद्यपीची गर्दी मुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दारू दुकाने बंद करण्याचा निर्णय मा. जिल्ह्धिकाऱयांनी आज एका पत्रकाद्वारे कळविले आहे. दुकाने चालू केल्यास कादेशीर कार्यवाही करणार असल्याचे कळविले आहे. 

चिंताजनक; हिंगोलीत एकाच दिवशी आणखी २४ रुग्ण, एकूण 76 झाले

Image
चिंताजनक; हिंगोलीत एकाच दिवशी आणखी २४ एसआरपीएफ जवानांसह एका परीचारिकेला कोरोनाची बाधा रुग्ण संख्या पोहचली ७६ वर ,आकडा वाढता वाढे हिंगोली - मुंबई वरून ड्युटी करून परतलेल्या २३ तर   सामान्य रुग्णालयातील एका परीचारिकेला  असे मिळून सुमारे  २४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास प्राप्त अहवालावरून समोर आले असून, पूर्वीचे आणि आताचे मिळून अश्या ७० जवानांना कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे. तर रुग्ण संख्या आता ७६ वर गेली आहे. मुंबई ,जालना येथून कर्तव्य बजावून परतलेल्या १९४ जवान हिंगोलीत दाखल झाल्यानंतर त्यांना १४ दिवस राज्य राखीव दलाच्या एका हॉल मध्ये क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यानंतर या सर्वांचे स्वाब नमुने औरंगाबाद येथील प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल सामान्य रुग्णालयात प्राप्त होताच यातील पहिल्या टप्यात४८ जवानांना कोरोना लागण झाल्याचे स्पस्ट झाले असताना ,त्यांना स्वतंत्र कक्षात भरती करण्या ऐवजी झालेल्या आणि न झालेल्या जवानांना एकत्र ठेवल्याची चूक भोवल्याने आजघडीला जवानांच्या रुग्ण संख्येत भर पडत आहे. बंदोबस्तासाठी गेलेल्या ७० जवा...