Posts

Showing posts from May 3, 2020

उदगीरच्या 2 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह एकूण 10 +ve झाले 

Image
उदगीरच्या 2 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह एकूण 10 +ve झाले विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज दिनांक 03.05.2020 रोजी एकूण 13 व्यक्तींचे  स्वॅब (कोविड 19)  तपासणी साठी आले होते. त्यापैकी 12 व्यक्तीचे स्वॅब उदगीर येथून आले होते. त्यापैकी 04 व्यक्तीचे अहवाल (Inconclusive) आले असल्यामुळे त्यांच्या स्वॅबची 48तासानंतर पुनर्तपसणी करण्यात आली त्यापैकी 2 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह, एका व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह व 01 व्यक्तीचा अहवाल पुन्हा (Inconclusive) आला असल्यामुळे त्यांची पुन्हा 48 तासानंतर स्वॅब घेऊन पुनर्तपासणी करण्यात येणार आहे व उर्वरीत नव्याने आलेल्या 8 व्यक्तीचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत.  विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील एका व्यक्तीच्या अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. सद्यस्थितीत एकही अहवाल प्रलंबित नाही अशी माहिती विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉक्टर गिरीष ठाकूर यांनी दिली.                                         ...

जिल्‍ह्‍यात 1168 कोटी  पिककर्ज वाटपाचे उद्दिष्ट

Image
जिल्‍ह्‍यात 1168 कोटी  पिककर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांनी कर्जवाटप सुरू करावे, जिल्‍हा उपनिबंधकाच्या सुचना  हिंगोली -  जिल्‍ह्‍याला आगामी खरीप हंगामासाठी 1168 कोटी 95 लाख रुपयाचे  पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आल्याची माहिती जिल्‍हा उपनिबंधक सुधीर मैत्रेवार यांनी दिली आहे.  आगामी खरीपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध करण्याच्या सुचना सहकार विभागाने बँकांना दिल्या आहेत. जिल्‍ह्‍यात असलेल्या एकूण उद्दिष्टापैकी जिल्‍हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 148 कोटी 89 लाख रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. इतर बँकांना 859 कोटी 10 लाख रुपयाचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तर ग्रामीण बँकांना 160 कोटी 96 लाख असे एकूण 1168 कोटी 95 लाख रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडानमुळे कर्जवाटप प्रक्रिया सध्या मंदावली आहे. दरवर्षी खरीप हंगामातील कर्ज वाटपाची प्रक्रिया एप्रील महिण्यापासून सुरू केली जाते यावर्षी हा महिणा लॉकडानमध्ये गेला आहे. त्‍यामुळे ज्‍या प्रमाणे कर्जवाटप होणे अपेक्षीत होते त्‍याप्रमाणे झाले...

लॉकडाऊनच्या काळात स्नेहलने रेखाटली आकर्षक  विविध कलाकृती

Image
लॉकडाऊनच्या काळात स्नेहलने रेखाटली आकर्षक  विविध कलाकृती हिंगोली -   गेली दीड महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन संचारबंदी आहे. त्यामुळे घरात बसून काय करावे असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मात्र पोदार इंटरनॅशनल स्कुल मधील इयत्ता सातवीतील स्नेहल गिरीधारी बोथिकर या विद्यार्थिनींनी लॉकडाऊनचा फायदा घेत एकापेक्षा एक शेकडो  विविध चित्रे रेखाटत आनंद घेत आहे. शहरातील गंगानगर येथे राहत असलेली स्नेहल बोथिकर हिला अगोदर पासून चित्र काढण्याचा आगळा वेगळा छंद आहे. तिचे वडील गिरीधारी बोथिकर हे जिल्हा परिषदेचे सीईओ यांचे स्वीय सहाय्यक म्हणून कामकाज पाहत आहेत. स्नेहल ही सध्या पोदार इंटरनॅशनल स्कुल येथे सातवीत आहे. तीला चित्रकलेची लहान पनापासून आवड असल्याने तिच्या वडिलांनी तिला प्रोत्साहन देत तिच्या कलेला स्वप्नात उतरविले आणि पाहता पाहता स्नेहलने एकापेक्षा एक विविध कलाकृती रेखाटत  सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात गेली दीड महिन्यापासून लॉकडाऊन, संचारबंदी लागू असल्याने शाळा, महाविद्यालय बंद ठेवले आहेत. त्यामुळे शाळकरी वि...

तब्बल पाच दिवसानंतर सुरु होणार अत्यावश्यक सेवा 

तब्बल पाच दिवसानंतर सुरु होणार अत्यावश्यक सेवा  जिल्हाधिकारी जयवंशी यांचे आदेश हिंगोली -  जिल्‍ह्‍यात कोरोना बांधीतांची वाढत असलेल्या संख्या लक्षात घेता जिल्‍हा प्रशासनाने मागच्या पाच दिवसापासून सर्वच आस्‍थापना बंद ठेवल्या होत्या. आता सोमवारपासून (ता.4) एक दिवसाआड भाजीपाला, जीवनावश्यक वस्‍तू विक्रीची दुकाने सुरू होणार असल्याचे आदेश जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत.  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक किंवा खाजगी जागेत पाच किंवा त्‍यापेक्षा अधिक व्यक्‍तीनी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे याला मनाई करण्यात आली आहे.  तसेच जिल्‍ह्‍यात कोरोना बाधीतांची वाढत असलेली संख्या लक्षात घेता जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी बुधवारपासून (ता.29) ते रविवारपर्यत (ता.3) जीवनावश्यक वस्‍तुच्या दुकानासह एक दिवसाआड सुरू असलेला बाजार देखील बंद केला होता.  आता परत बाजारासह किराणा दुकान, भाजीपाला, दुधविक्री केंद्रे, परवाना असलेले चिकन, मटन शॉप, बेकरी, स्‍वीटमार्ट संबधीत दुकाने दिवसाआड सुरू राहणार आहेत.  ही दुकाने सकाळी नऊ ते एक यावेळात सुरू राहणार आहेत. तसेच...

एकूण: कोरोना पॉझिटिव च्या 8 च ऍक्टिव्ह केसेस

Image
एकूण: कोरोना पॉझिटिव च्या 8 ऍक्टिव्ह केसेस हा रिपोर्ट जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून प्राप्त झालेला आहे. या रिपोर्ट मधील माहिती 3 मे 2020 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंतची आहे. एकूण: कोरोना पॉझिटिव च्या 8 ऍक्टिव्ह केसेस आहेत. माहितीसत्व

रेड झोन सह ( मधील कॉन्टटमेन्ट झोन सोडून ), ऑरेंज व ग्रीन झोन मधील दारू दुकाने उद्या चालू होणार

Image
रेड झोन ( मधील कॉन्टटमेन्ट झोन सोडून )ऑरेंज  व  ग्रीन झोन  मधील  दारू दुकाने चालू होणार पान टपऱ्या चालू होणार  5 लोक प्रत्येकी 6 फुटाचे अंतर ठेऊन दारू विकत घेता येईल, दारू पिणाऱयांची सोय झाली असून आता माहागाची दारू विकत घेण्याची गरज नाही. फक्त वाईन शॉप कांही अटीवर सुरु करण्याची परवानगी दिली जात आहे. रेड झोन ( मधील कॉन्टटमेन्ट झोन सोडून ) ऑरेंज  व  ग्रीन झोन ,  दुकाने सुरु होणार.