Posts

Showing posts from May 2, 2020

 उदगीर येथील 51 व्यक्तींचे स्वॅब सर्व नमुने निगेटिव्ह,

Image
   उदगीर येथील 51 व्यक्तींचे स्वॅब नमुने निगेटिव्ह लातूर : आज पर्यंत 8 +ve, 1 मृत  लातूर, दि.2:- विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज दिनांक 02 मे ब2020 रोजी एकूण 53 व्यक्तींचे  स्वॅब (कोविड 19)  तपासणी साठी आले होते. हे सर्व 51 व्यक्तीचे स्वॅब उदगीर येथून आले होते. त्यापैकी 31 व्यक्ती पॉझिटिव्ह व्यक्तीवर उपचार केलेले डॉक्टर्स, नर्सेस, व त्यांच्या संपर्कात आलेले सफाईगार व इतर कर्मचारी यांची पाचव्या दिवशी पुनर्तपासणी करण्यात आली या सर्व 31 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. ही बाब आरोग्य यंत्रणेसाठी अत्यंत दिलासादायक आहे. उर्वरित 20 व्यक्ती ह्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या / मयत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या होत्या त्या सर्व व्यक्तींच्या  स्वॅबची तपासणी केली असता त्या सर्व 20 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील दोन व्यक्तींच्या  स्वॅबची  तपासणी केली असता त्या दोन्ही व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. सद्यस्थितीत एकही अहवाल प्रलंबित नाही अशी माहिती विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय वि...

हिंगोलीने कोरोना बाधितांनी केला हाफ सेंच्युरीचा आकडा पार

Image
हिंगोलीत आणखी नवे ५ जवान पॉझिटिव्ह   कोरोना बाधितांनी केला हाफ सेंच्युरीचा आकडा पार हिंगोली -  मालेगाव,मुंबई येथून बंदोबस्तावरून परतलेल्या १९४जवानांना कोरंटाइन करण्यात आले. यापैकी शनिवारी आणखी पाच जवान पॉझिटिव्ह असल्याचे अहवालावरून समोर आले आहे. त्यामुळे कोरोना बाधितांच्या संख्येने हाफ सेंच्युरीचा आकडा पार केला आहे.  क्वारंटाइन करण्यात आलेल्या  राज्य राखीव दलाच्या 53 जवानाना कोविड ची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.यातील एक रुग्ण बरा होऊन निगेटिव्ह आल्याने त्यास सुट्टी देण्यात आली असून शनिवारी संध्याकाळी आणखी नवे सहा जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पस्ट झाल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.  जिल्हा सामान्य रुग्णालयातील  आयसोलेशन वॉर्डात क्वारंटाइन करण्यात आलेल्या एकूण  एसआरपीएफच्या ४७  जवाना पैकी यातील ४६ राज्य राखीव व एक जालना  या जवानांना कोरोनाची लागण झाली आहे.४७पैकी ३४मालेगाव येथे कार्यरत होते तर १३ जवान मुंबई येथे कार्यरत होते. यापैकी ४७ कोरोना बाधित जवानांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात भरती केले असून सर्वां...

सावत्र मुलाद्वारे वडिलाचा खून

सावत्र मुलाद्वारे वडिलाचा खून परभणी, गावंडे, जि. प्रतिनिधी शहरातील विकासनगर भागात शनिवारी(दि.2) दुपारी साडेतीनच्या सुमारास एका सावत्र मुलाने आपल्या वडिलाचा धारधार शस्त्राचे वार करीत खून केल्याची घटना उघडकीस आली. दरम्यान, याप्रकरणात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संबंधीत आरोपीस पोलिसांनी अटकही केली आहे. विकासनगर भागातील युसुफ खान अब्दुल मजीद खान पठाण (वय53) हे घरात झोपले होते. त्यावेळी त्यांच्या दुस-या पत्नीचा मुलगा मैनू खान याने त्यांच्या छातीवर आणि पोटावर चाकूचे वार केले. त्यात ते गंभीर जखमी झाले. कुटुंबियांनी तातडीने रूग्णालयात आणले परंतू ते मृत्यू पावले होते. कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून आरोपीस ताब्यात घेतले आहे. सहाय्यक पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी घटनास्थळी भेट दिली. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

कोटयाहून सारे मुले दाखल जिल्हा प्रशासनाद्वारे मुलांसाठी खास बसेस उपलब्ध

कोटयाहून सारे मुले दाखल जिल्हा प्रशासनाद्वारे मुलांसाठी खास बसेस उपलब्ध परभणी, गावंडे   प्रतिनिधी लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर कोटा(राजस्थान) या शहरात शिक्षणाच्या निमित्ताने अडकून पडलेल्या शहरासह जिल्ह्यातील 34  विद्यार्थ्यांना जिल्हा प्रशासनाने खास बसेस तैनात करीत माघारी आणले. गेल्या सव्वा महिन्यापासून हे विद्यार्थीं कोटयात अडकून पडले होते. त्यामुळे त्यांचे पालक कमालीचे चिंतेत होते. या मुलांना आणण्याकरिता परवानगी द्यावी, असा अशी मागणी पालक वर्गातून होत होती. विशेषतः उत्तरप्रदेश व अन्य राज्यांनी आपआपल्या राज्यातील मुलांना खास बसेसद्वारे माघारी आणल्यानंतर पालकवर्गातून मोठा दबाव निर्माण झाला. त्यावेळीच राज्य सरकारने त्या-त्या जिल्ह्यातील प्रशासनाने या मुलांना आणण्या संदर्भात पाऊले उचलावीत, अशा सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी अन्य अधिका-यांच्या मदतीने जिल्ह्यातील मुलांना आणण्याकरिता राज्य परिवहन महामंडळाच्या दोन बसेस पाठविल्या. त्या बसेस शुक्रवारी रात्री औरंगाबाद मार्गे परभणीत दाखल झाल्या. बसेसमधील मुलांना लगेचच एमआयडीसीतील एका हॉटेलमध्ये तात्पुरत्य...