Posts

Showing posts from April 29, 2020

उदगीर कोरोना ग्रस्तांची संख्या सात झाली

Image
उदगीर कोरोना ग्रस्तांची एकूण संख्या सात झाली लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेत आज उदगीर येथिल 16 व्यक्तीच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली त्यापैकी  1 व्यक्तीचा  अहवाल पॉझीटीव्ह आला  असून काल  3 व्यक्तीचे अहवाल प्रलंबित होते,  त्यांचे अहवाल आज   पॉझीटीव्ह  आले  आहेत.    काल 3 व आज 4 असे एकूण लातूर जिल्यात  7   रुग्णांचे अहवाल पॉझेटिव्ह झाले आहेत. व 1 महिला मृत झाली आहे. तर पूर्वीच 8 रुग्ण बरे झाले आहेत. 

हिंगोलीत पुन्हा दोघे कोरोना पॉझिटिव्ह

Image
हिंगोलीत पुन्हा दोघे कोरोना पॉझिटिव्ह कोरोना बाधितांची संख्या १६ वर पोहचली ,जिल्हा प्रशासनाची धाकधूक वाढली हिंगोली -  मुंबई येथून परतलेल्या राज्य राखीव दलाच्या एका जवनासह बारसी येथून वसमत मध्ये आलेल्या अश्या एकूण दोघा जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल बुधवारी( ता.२९) प्राप्त झाला असून आता कोरोना बाधितांची संख्या सोळा वर पोहचली असल्याने जिल्हा प्रशासनाची धाकधूक वाढली आहे. आजघडीला जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात हिंगोली एसआरपीएफचे बारा व जालना एसआरपीएफचा एक असे एकूण तेरा जवान पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर जालना येथील एसआरपीएफ जवानाच्या संपर्कातील त्याच्या चार वर्षे पुतण्याला देखील कोरोनाची लागण झाली आहे .एकूण चौदा संख्या झाली. मंगळवारी पुन्हा सेनगाव तालुक्यातील जांभरून रोडगे येथील पाच वर्षाच्या बालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्ण संख्या १५ वर गेली असताना (ता.२५) रोजी बारसी येथून वसमत मध्ये कोरंटाइन मध्ये ठेवलेल्या २१ वर्षीय व्यक्तीचा अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आल्याने आता जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या सोळा वर पोहचली आहे. जिल्ह्यात कोरोना बा...