Posts

Showing posts from April 28, 2020

उदगीर येथील 35 पैकी 32 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह

Image
32 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह संगम पटवारी : लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेत आज उदगीर येथिल 35 व्यक्तीच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली त्यापैकी  32 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 3 व्यक्तीचे अहवाल प्रलंबित आले आहेत. अंबाजोगाई येथून आलेल्या 1 व्यक्तीच्या  स्वॅबची  तपासणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह  आला आहे व कासारशिरसी येथे मृत झालेल्या व्यक्तीच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.                                                       

हिंगोलीत पाच वर्षीय बालकाला कोरोनाची लागन

Image
हिंगोलीत पाच वर्षीय बालकाला कोरोनाची लागन  कोरोना बाधीतांची संख्या 14 वर पोहचली ,जिल्हा प्रशासनाची धाकधूक वाढली हिंगोली -  जिल्ह्यातील सेनगाव येथील विलगीकरण कक्षात भरती असलेल्या पाच वर्षीय बालकाचा कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .त्यामुळे आता जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 14 वर पोहचली असून जिल्हा प्रशासनाची धाकधूक वाढली आहे.काही काळ ग्रीनझोन ठरलेला हिंगोली जिल्हा आता रेड झोन च्या मार्गावर असून मराठवाड्यात औरंगाबाद पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर येऊन ठेपला आहे. हिंगोली जिल्ह्यातील 14 रुग्णांमध्ये 12 जन हे केंद्रीय सुरक्षा बलाचे जवान आहेत. तर आणि एका व्यक्तीसह विलगीकरण कक्षातील पाच वर्षे बालकाला कोरण्याची लागण झाल्याचा अहवाल रात्री उशिरा प्राप्त झाला. हिंगोली जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 14 वर पोहोचली असल्याने हिंगोली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी आपल्या घरातच राहून शासन आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन हिंगोली जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. प्रारंभी जिल्हा प्रशासनाने विविध उपाय योजना हाती घेत जिल्ह्यात कोरोना रोखण्...

खासदार सुप्रियाताई कडून हिंगोलीच्या वाहतूक शाखेला सॅल्यूट 

Image
खासदार सुप्रियाताई कडून हिंगोलीच्या वाहतूक शाखेला सॅल्यूट मोकाट जनावरांना चारा टाकतानाचा फोटो फेसबुकवर केला शेअर हिंगोली - लॉकडाऊन मुळे शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला असताना वाहतूक शाखेच्या पोलिसांनी माणुसकी दाखवत जनावरांना चारा टाकतानाचा फोटो शेअर करीत खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह आमदार रोहित पवार यांनी हिंगोली पोलिसांना सॅल्यूट केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संसर्ग होऊ नये यांची खबरदारी घेत नागरिकांना घरात सुरक्षित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. तर दुसरीकडे किराणा, मेडिकल, भाजीपाला वगळता सर्व आस्थापना बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे एरव्ही रस्त्यावर नागरिका ऐवजी मोकाट जनावरांचा सुळसुळाट पहावयास दिसत आहे.  जिल्ह्यात कोरोना संसर्ग पसरवू नये यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी दानशूर व्यक्तीच्या पुढाकारातून पालिकेकडे धान्य पुरवठा केला जात आहे. त्यातून धान्याचे किट तयार करून गरजू नागरिकांना वाटप करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. जिल्हाधिकारी रुचेश  जयवंशी ,पोलीस अधीक्षक योगेशकु...