जैन संघटनेद्वारे डॉक्टर आपल्या दारी उपक्रम
जैन संघटनेद्वारे डॉक्टर आपल्या दारी उपक्रम तपासणीसह मोफत औषधी वितरण परभणी,प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील भारतीय जैन संघटना व पी.डी.जैन होमिओपॅथिक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम रविवारी(दि.26) अक्षय्य तृतीयेचे मुहुर्तावर सुरू करण्यात आला. यातून विनामूल्य तपासणी व मोफत औषधी वितरण केली जाणार आहे. रविवारी येथील संत गाडगेबाबा नगरात यानिमित्ताने छोटाखानी कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. त्याद्वारे तेथील नागरिकांची आरोग्य तपासणी व मोफत औषधी वितरीत करण्यात आल्या. हा उपक्रम परभणीतील विविध ठिकाणी पुढील 15 दिवस करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात परिसरातील 200 पेक्षा अधिक नागरिकांची प्राथमिक मोफत आरोग्य तपासणी व औषधी तज्ञाद्वारे देण्यात आली. कार्यक्रमासाठी डॉ.केदार कटिंग, डॉ. रामेश्वर नाईक, डॉ. सागर मोरे डॉ सुहास विभुते उपस्थित होते. पी.डी. जैन होमिओपॅथिक महाविद्यालयातून या कार्यक्रमासाठी मोफत अॅम्बुलन्स व कर्मचारीवृंद उपस्थित होते.नगरसेवक सचिन देशमुख,चंद्रकांत शिंदे, रितेश जैन, यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी होण्यासाठी व...