उदगीरमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण, ७० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह
उदगीरमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण, ७० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह संगम पटवारी : उदगीरमधील रुग्णाबाबत माहिती कळल्यानंतर राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी तातडीने आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधून इतरांना लागण पसरू नये यासाठी काळजी घ्यावी असे कळविले आहे. उदगीरमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण, ७० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह लातूर : उदगीर शहरात शनिवारी एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. लातूर जिल्ह्यात स्थानिकांना बाधा नव्हती, मात्र, परराज्यातील आठ यात्रेकरू बाधित निघाले होते. ते सर्वजण कोरोनामुक्त झाल्याने समाधान होते. दरम्यान उदगीरच्या बातमीने चिंता वाढली आहे. उदगीरमध्ये हा पहिलाच रुग्ण आढळला आहे, त्यांचा प्रवास इतिहास काय आहे, तो स्थानिक की बाहेरील याची माहिती घेतली जात आहे. उदगीरमधील रुग्णाबाबत माहिती कळल्यानंतर राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी तातडीने आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधून इतरांना लागण पसरू नये यासाठी काळजी घ्यावी, असे निर्देश दिले आहेत. सदरील रुग्ण महिला असून, ती 70 वर्षांची आहे. अन्य आजारांनी त्रस्त असल्याने ती रुग्णालयात आली होती. दरम्यान उदगीरवासीयांनी घाबरून जाऊ न...