दिलीप चव्हाण यांना उपमुख्यमंत्री अजीत पवार यांचा सल्ला
दिलीप चव्हाण यांना उपमुख्यमंत्री अजीत पवार यांचा सल्ला जिल्ह्यातील नागरीक, कुटूंबासह स्वतःची काळजी घ्या हिंगोली - कोरोना विषाणुजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत जिल्ह्यातील परिस्थिती जाणून घेतली चव्हाण यांनीही प्रशासन व आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या उपाय योजना संदर्भात उपमुख्यमंत्र्यांना माहिती दिली. यावेळी मतदारसंघातील नागरिकांना सोशल डिस्टन्सचे पालन करण्याचे सांगत काळजी घेण्याचा सल्लाही दिला. कोरोना विषाणूजन्य आजाराचा संसर्ग व त्यानंतरची निर्माण झालेली परिस्थिती पाहता सर्वच कामकाज ठप्प झाले आहे. या स्थितीत उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी संकटाच्या काळात राज्यातील परिस्थिती व्यवस्थीत सांभाळत सर्व प्रशासकीय यंत्रणा कामात असून त्यावर नियंत्रण आहे. सर्वसामान्य नागरिक, पक्षाचे पदाधिकारी, आमदार, खासदार यांच्यासह नागरीकांशी संपर्क ठेवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांना उपमुख्यमंत्र्यांनी दूरध्वनी करून कोरोना पार...