Posts

Showing posts from April 22, 2020

हिंगोलीत सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासनाची धाकधूक वाढली

हिंगोलीत सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासनाची धाकधूक वाढली हिंगोली - दोन दिवसांपूर्वी मुंबई व मालेगाव येथून बंदोबस्ता वरून परतलेल्या १९४ जवानांना क्वारंटाइन करून ,त्या सर्वांचे स्वाब नमुने औरंगाबाद येथील प्रयोग शाळेकडे पाठविले होते. त्याचे नमुने प्राप्त होताच यातील सहा जवानांना कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे आवाहाला वरून स्पस्ट झाल्याने जिल्हा प्रशासनाची धाकधूक वाढली आहे. हिंगोली येथील राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या मालेगाव व मुंबई येथे दोन महिन्यांपूर्वी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बंदोबस्तावर गेले होते .दरम्यान याच काळात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव  वाढल्याने या सर्वांना त्या ठिकाणी ठेवण्यात आले होते. मात्र बंदोबस्ताचा कालावधी पूर्ण झाल्याने यातील दोन्ही तुकड्या परत पाठविण्यात आल्या. यामध्ये मालेगाव ,मुंबई येथे १९३  जवान कर्तव्य बजावण्यासाठी गेले होते .शनिवारी मालेगावची ९१ जवानांची एक तुकडी हिंगोलीत दाखल झाली. तर रविवारी मुंबई येथून १०२ जवानांची तुकडी दाखल झाली होती. या १९३ जवानांची येथील राज्य राखीव बल गटाच्या कार्यालयात १४ दिवस क्वारंटाइन करून त्या...