शहरातील गल्लीबोळातील रस्ते वाहतुकीसाठी बंद ,मुख्य रस्त्याचाच होणार वापर
शहरातील गल्लीबोळातील रस्ते वाहतुकीसाठी बंद ,मुख्य रस्त्याचाच होणार वापर हिंगोली नगरपरिषदेने लावले बॅरिकेट,सीसीटीव्हीची राहणार करडी नजर हिंगोली - कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात आपतकालीन परिस्थिती व संचारबंदीमुळे नागरिकांना घराच्या बाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने मंगळवारी शहरातील गल्लीबोळातील रस्ते बंद करून रस्त्यावर बॅरिकेट लावण्यात आले आहेत. त्यामुळे केवळ मुख्य रस्ता वाहतुकीसाठी ठेवण्यात आला असून, सीसीटीव्हीची नागरिकांवर करडी नजर राहणार असल्याची माहिती सीओ पाटील यांनी दिली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी राज्यात आपतकालीन परिस्थिती व संचारबंदीची घोषणा केल्यानुसार जिल्ह्यात कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी ,पोलीस अधीक्षक योगेशकुमार, महसूल विभाग ,आरोग्य यंत्रणा यांच्या मार्गदर्शनाखाली सीओ रामदास पाटील यांनी शहरातील गल्ली बोळात रहदारीचा वावर न होता अत्यावश्यक कारणासाठी केवळ मुख्य रस्त्यावरच वाहतूक होण्यासाठी मंगळवारपासून मुख्य रस्ते तेवढे वाहतुकीसाठी खुले राहणार अस...