Posts

Showing posts from April 20, 2020

*कोरोनाच्या लाँकडाऊन काळात महिलांमध्ये "पापड" बनविण्याची क्रेज*....ग्रामीण भागात महिलांची पापड,दाळीची ची मेजवानी....

Image
प्रतिनिधी / शरद राठोड    सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना नावाच्या वाढत्या आजाराचा प्रादुर्भाव पाहता प्रशासनाकडून पुन्हा लाँकडाऊन वाढविण्यात आलेले आहे.त्यामुळे वारंवार या आजारावर मात करण्यासाठी प्रशासन सामंजस्याने विविध प्रकारच्या भुमिका घेताना दिसत आहे.पण याचं लाँकडाऊन च्या काळात घरां-घरांतील "होम-मिनिस्टर" अर्थातच महिला वर्ग मात्र विविध प्रकारच्या पापडांची मेजवानी तयार करताना ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पहावयास मिळत आहे.  रेणापूर तालुक्यातील पुर्वकडील येणारी गावे ज्यामध्ये  शेरा,पोहरेगांव,पोहरेगांव तांडा,ईट्टी,भोकरंबा,डिघोळ या ठिकाणी महिलांकडून विविध प्रकारचे पापड बनविण्यात मग्न असल्याचे पहावयास मिळत आहे.या भागांत महिलांकडुन बाजरी,शाबुदाणा,बटाटे,तांदूळ, ऊडीद,गहू,रवा ई यांसारख्या विविध प्रकारचे पापड तयार करण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहेत.सध्या सुरू असलेल्या या लाँकडाऊन मध्ये आजवर ज्या पद्धतीने कामे झाली नाहीत,त्यापेक्षाही कितीतरी अधिक प्रमाणात पापड व दाळी बनविण्यात आल्याने घराघरांत रेलचेल मोठ्या प्रमाणात वाढली आहे.  कोरोनाला हरविण्यासाठी सगळीकडे संचारबंदी अ...