परभणीतील कोरोना बाधिताचे रेडगावशी कनेक्शन
परभणीतील कोरोना बाधिताचे रेडगावशी कनेक्शन हिंगोली - परभणी येथे गुरुवारी कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र या रुग्णाचे कनेक्शन रेडगावशी असल्याने पुन्हा जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. वसमत येथे मर्कज येथून आलेल्या संशयिताला खोकला व ताप अशी कोरोनासी साम्य असलेली लक्षणे दिसून येत असल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याचे स्वाब नमुने प्रयोग शाळेत पाठविले असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याच्यावर औषधी उपचार सुरु होते. पुन्हा नमुने तपासणी साठी पाठविले असता त्यांचा अहवाल मंगळवारी निगेटिव्ह आला असून दुसरा अहवाल येणे अपेक्षित असल्याने जिल्हा प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला होता.परंतु परभणी येथे पुणे येथून पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने पुन्हा चिंता वाढली आहे. पहिल्या २१दिवसाच्या लॉकडाऊन काळात परभणी हा ग्रीन झोन मध्ये होता. मात्र अचानक गुरुवारी परभणी येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने संपूर्ण यंत्रणा अलर्ट झाली आहे.परंतु या पॉझिटिव्ह रुग्णाची तपासणी व चौकशी केली असता या रुग्णाचे हिंगोली जिल्ह्यात...