Posts

Showing posts from April 15, 2020

अंगणवाडीतील साडेबारा हजार बालकांची आरोग्य तपासणी डेप्युटी सीईओ गणेश वाघ यांची माहिती

Image
अंगणवाडीतील साडेबारा हजार बालकांची आरोग्य तपासणी डेप्युटी सीईओ गणेश वाघ यांची माहिती हिंगोली -  कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तीन वर्षांच्या आतील अंगणवाडीतील  सुमारे  बारा हजार ७९९ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आल्याची माहिती महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांनी दिली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात लाॅकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हयात जिल्हा प्रशासनाच्या अधिपत्याखाली  विविध विभाग कोरोना विषाणू रोखण्यासाठी अहोरात्र काम करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात केवळ एक रुग्ण पॉझिटिव्ह सापडला असून तोही निगेटिव्हच्या मार्गावर आहे. त्यानुसार कोरोनाचा संसर्ग व प्रसार होऊ नये याची खबरदारी म्हणून बाहेर जिल्ह्यातील हिंगोलीत दाखल झालेल्या नागरिकांची आरोग्य यंत्रणेकडून तपासणी केली जात आहे. गावात आलेल्या एखाद्या कोरोना संशयिताच्या संपर्कात लहान बालके येऊ नये याची खबरदारी म्हणून आता जिल्हाधिकारी रुचेश  जयवंशी ,जिल्हा परिषदेचे सीईओ राधाबिनोद शर्मा यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील एक हजार ८९ अंगांवाड्यातील तीन वर्षांच्या आतील बाल...

कोरोनाच्या पाश्वभूमीवर बँक व्यवस्थापकांना आदेश जारी

Image
कोरोनाच्या पाश्वभूमीवर बँक व्यवस्थापकांना आदेश जारी हिंगोली,दि.15:   जागतिक आरोग्‍य संघटनेने कोरोना (कोवीड-19) हा विषाणू मूळे पसरत असलेला आजार साथीचा संसर्गजन्‍य आजार म्‍हणून घोषीत केला आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रसार भारतात तसेच महाराष्ट्रातील शहरात गतीने पसरत आहे. राज्‍य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथीचा रोग प्रतिबंधात्‍मक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2020 रोजीपासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतूदी नुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्‍याबाबतची नियमावली तयार करण्‍यात आलेली आहे. त्‍याशिवाय भारत सरकार आरोग्‍य मंत्रालय, महाराष्‍ट्र शासन आरोग्‍य मंत्रालय यांनी जाहीर केल्याप्रमाणे कोरोनाग्रस्त रुग्‍णांच्या संपर्कात नागरिकांनी येवू नये. तसेच सार्वजनिक किंवा खाजगी जागेत पाच किंवा त्‍यापेक्षा अधिक व्‍यक्‍तींनी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे, काही कार्यक्रमाचे आयोजन केल्‍यास या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्‍याची शक्‍यता लक्षात घेता सर्वसामान्‍य जनता व त्‍यांचे आरोग्‍यास धोका असल्‍याने त्‍याकरिता तात्‍काळ प्रत...

पौरोहित्य करणाऱ्या ब्राम्हणांना आर्थिक मदत करावी

Image
  जिल्हाकचेरीकडे  निवेदनाद्वारे मागणी   हिंगोली -  कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी म्हणून शासनाच्या आदेशानुसार  जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात संचारबंदी लागू केल्याने ब्राह्मण पोराहित्याची गैरसोय होत  असून उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे ब्राह्मण पौरोहित्य संघटनेने जिल्हाधिकारी यांच्याकडे बुधवारी निवेदनाद्वारे आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे.   यावेळी शहरातील ब्राह्मण पौरोहित्य बालाजी जोशी, राजेश जोशी, प्रभाकर ऋषी, अतुल दलाल, धोंडोपंत पाठक, संतोष उन्हाळे, किशोर ऋषी, सुभाष बंडाळे ,अनिरुद्ध शार्दूल, उमेश मुळे, दिवाकर धर्माधिकारी, लक्ष्मीकांत पाठक, प्रतीक जोशी, शुभम पाठक, सचिन घन आदींनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्फत पंतप्रधान मुख्यमंत्री ,यांच्याकडे लॉकडाऊन मुळे घरात बसून राहण्याची वेळ आली असून उपजीविका करण्यास बाहेर पडता येत नाही. त्यामुळे पौरोहित्य करणाऱ्या ब्राह्मणांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  पुन्हा १९ दिवसाचा लॉकडाऊन केला आहे.त्यामुळे उर्वरित दिवसात कुटुंबाची उपजीविका कशी करावी असा गहन प...

दानशुर व्यक्‍तीकडून मिळालेल्या मदतीचे गरजुना वाटप हिंगोली नगरपरिषदेचा पुढाकार

Image
  हिंगोली -  कोरोनाच्या पार्श्वभुमीवर  शहरात कोणताही गरजु उपाशी राहणार नाही याची काळजी घेत नगरपालिका प्रशासनाने दानशुरांना मदतीचे आवाहन केल्यानंतर मदत संकलन केंद्राकडे दररोज मोठ्या प्रमाणार मदत येत असून ती मदत गरजुपर्यत पोहचविण्याचे काम पालिका प्रशासन करीत असल्याची माहिती मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी दिली आहे.    कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडानमुळे मजुरांच्या हाताला काम नसल्याने ते अडचणी सापडले आहेत. तसेच शहरात परप्रांतीय नागरीक देखील सीमाबंदीमुळे अडकून पडल्याने त्‍यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्‍यांना लोकप्रतिनिधी विविध संस्‍था, मंडळाने मदत देणे सुरू केले होते मात्र नियमित मदत देण्यासाठी आणखी गरज भासू लागल्याने नगरपालिकेचे मुख्याधीकारी रामदास पाटील यांनी शहरातील दानशुर व्यक्‍तींना तसे आवाहन केले होते त्‍यानंतर पालिकेतर्फे मदत संकलन केंद्र सुरू करून पालिकेचे कर्मचारी घरपोच जावून मदत स्‍विकारत आहेत.    त्‍याप्रमाणे जमा झालेली मदत गरजुपर्यत पोहचविण्याचे काम पालिका प्रशासनाने सुरू केले आहे. दरम्‍यान बुधवारी (ता.15) दानशुर व्यक्‍ती, स...

दोघांचे अहवाल प्रलंबीत तर कोरोना ग्रस्ताचा अहवाल निगेटिव्ह

Image
  हिंगोली - येथील जिल्‍हा सामान्य रुग्णालयात दाखल केलेल्या कोरोना ग्रस्ताचा अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.    बुधवारपर्यत  दाखल असलेल्या आयसोलेशन वार्डात एकूण ४३ रुग्णांना उपचारासाठी भरती केले होते.   तर  कोवीड-19 पॉझीटीव्ह आलेल्या रुग्णांची संख्या १, तसेच (ता.१५) एप्रील रोजी दाखल झालेल्या रुग्णाचा आज १४ दिवसाच्या उपचारानंतर पहिला थ्रोट स्‍वॅब नमुना तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. कोवीड-19 निगेटीव्ह आलेल्या ४३ रुग्णांची संख्या  आहे, आयसोलेशन वार्डातून  ४२ संशयित रुग्णांना होम क्वारांटाइन ठेवले आहे. तसेच वसमत येथील शासकिय क्‍वांरटाईन सेंटर बारा जणांना  ठेवण्यात आले आहे. शासकिय क्‍वांरटाईन सेंटर मध्ये असलेल्या व रिपार्ट प्रलंबीत असलेल्या रुग्णांची संख्या २ असल्याची माहिती जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली.

रास्तभाव दुकानदार संघटनेचे पुरवठा विभागाकडे निवेदन

रास्तभाव दुकानदार संघटनेचे पुरवठा विभागाकडे निवेदन हिंगोली -  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊमुळे गरीब कल्याण योजनेतंर्गत टप्याटप्याने तीन महिण्याचे मोफत धान्य वाटपा बाबत स्‍वस्‍तधान्य दुकानदार संघटनेने जिल्‍हा पुरवठा अधिकारी अरुणा संगेवार यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. या बाबत संघटनेचे अध्यक्ष भिकुलाल बाहेती, सचिव आशेक काळे, फारूख पठाण, नवनाथ कानबाळे यांनी निवेदन दिले आहे की, अंत्योदय व इतर योजनेतील लाभार्थ्याना मोफत धान्य वाटप करण्याचे आदेश काढले आहेत. त्‍याचे दुकानदारांना कोणतेही कमीशन नाही त्‍यामुळे धान्याच्या गोदामापासून स्‍वस्‍तधान्याच्या भावाची चढाई व उतराई करण्याची हमाली शासकिय कंत्राटदाराच्या करारात नमुद आहेत. त्‍यामुळे त्‍यांनीच ती अदा करावी मात्र ट्रकसोबत हमाल पाठविले जात नसल्याने त्‍याचा खर्च दुकानदारांनाच करावा लागत आहे.  यात कंत्राटदाराने दुकानात धान्याची थप्पी मारून वजन करून देण्यास आदेशीत करावे तसेच राशनकार्डावर जास्‍त नावे आहेत तर मशीनवर तेवढी नावे नाहीत परंतू कार्डधारक कार्डावरील संख्येवरून धान्याची मागणी करीत आहेत. मात्र मशीनमध...

बँकेतील गर्दी टाळण्यासाठी दोन मिटरचे अंतर ठेवा जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे अग्रणी बँकेच्या व्यवस्‍थापकास पत्र 

बँकेतील गर्दी टाळण्यासाठी दोन मिटरचे अंतर ठेवा जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे अग्रणी बँकेच्या व्यवस्‍थापकास पत्र  हिंगोली - कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी बँकेत होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्राहकात दोन मिटरचे अंतर ठेवावे यासाठी त्याप्रमाणे गोल चौकोन आखण्यात यावेत असे पत्राद्वारे  जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्‍हा अग्रणी बँकेचे व्यवस्‍थापक यांना बुधवारी आदेश दिले आहेत.  राज्य शासनाच्या आरोग्य मंत्रालयाने जाहीर केल्याप्रमाणे कोरोनाग्रस्‍ताच्या संपर्कात लोकांनी येवू नये तसेच सार्वजनिक किंवा खाजगी जागेत पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्‍तीने एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे काही कार्यक्रमाचे आयोजन केल्यास या विषाणूचा संसर्ग व प्रादूर्भाव पसरण्याची शक्‍यता लक्षात घेता सर्व सामान्य जनतेस व त्‍याचे आरोग्यास धोकादायक ठरत आहे. त्‍यामुळे तात्‍काळ प्रतिबंधात्‍मक उपाय करणे आवश्यक आहे.  विविध योजनेच्या लाभार्थ्याची पैसे काढण्यासाठी बँकेत गर्दी होत असून सोशल डिस्‍टन्सचा भंग होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्‍यामुळे बँकेतील गर्दी टाळण्यासाठी सर्व शाखा व्यवस्‍थाप...