Posts

Showing posts from April 14, 2020

पोलीस खात्यास विनंती आपल्या " लाठीची " गरज नाही,  आपल्या " काठीची " गरज आहे.

Image
पोलीस खात्यास विनंती                   पोलीस खात्यास विनंती   आपल्या " लाठीची " गरज नाही,   आपल्या " काठीची " गरज आहे.                                                                    संपादक :  नरसिंह घोणे                 सध्या भूतलावर प्रत्येक नागरीकाच्या मनात  " कोरोना " या नावाचे राक्षस प्रत्येकाच्या मानगुटीवर येवून बसले आहे, कधी ते नरड्यात उतरून जिव घेवून जाईल अशी भिती निर्माण झाली आहे.  या मध्ये ब्रिटनसारख्या देशाचा पंतप्रधानही सुटला नाही, तर कोण कलाकार, श्रीमंत की गरीब हे ही तो पहात नाही. नव्वद दिवसात मृत्युची संख्या एक लाखावर पोंहचली असुन संशयीतचा दहालाखावर आकडा गेला आहे. चीन, अमेरीका, इटाली, फ्रान्स पासुन भारता पर्यंत प्रत्येक देश लॉकडाऊन झाले आसुन पत्येक देशातील नागरीक घरामध्ये अडकून पडला आहे. क...