रानडुकराच्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी इसापुर रमणा येथील घटना
रानडुकराच्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी इसापुर रमणा येथील घटना हिंगोली - तालुक्यातील इसापूर रमणा येथे रानडुकरांचा सुळसुळाट वाढल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. सोमवारी रानडुकराने शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यावर हल्ला केल्याने शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी तीनच्या सुमारास घडली. यामुळे इसापुर परिसरातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. इसापुर येथील माधव रायाजी जगताप हे आपल्या शेतात सोमवारी काम करीत असताना अचानक एका रानडुकराने हल्ला करून एका पायाच्या मांडीवर गंभीर दुखापत केली. दरम्यान,माधव जगताप यांच्यावर रानडुकराने हल्ला करताच ते जोराने ओरडले असता आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेत त्यांना रानडुकराच्या तावडीतून वाचविले यावेळी विश्वनाथ चौतमल,माजी सरपंच लक्ष्मण जगताप, बालाजी हराळे यांनी सावध गिरी बाळगून माधव जगताप यांना रानडुकराच्या तावडीतून वाचविले. त्यानंतर या सर्वांनी तातडीने माधव जगताप यांना खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. रानडुकराने माधव जगताप यांच्या डाव्या पायाच्या मांडीला जोरदार हल्ला चढवीत गंभीर जखमी केले यात त्यांच्या प...