रास्तभाव दुकानातील धान्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा
रास्तभाव दुकानातील धान्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा तहसीलदार ज्योती पवार यांची माहिती वसमत - तालुक्यातील रेशन धान्याचे लाभार्थ्यांना नियमित धान्य व प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा मोफत तांदूळ वाटपाचा रास्त भाव दुकानदाराकडून धान्याची उचल करून लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार ज्योती पवार यांनी केले आहे. वसमत तालुक्यातील सर्व लाभार्थी शिधापत्रिका धारकांना आवाहन करण्यात येते की माहे एप्रिल करिताचा प्राधान्य कुटुंब योजना व अंत्योदय कुटुंब योजनचे धान्य सर्व 168 दुकानदार याना तालुका गोदामातून पोहोच झाले असून शेतकरी कुटुंब योजना व प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा प्राधान्य कुटुंब व अंत्योदय कुटुंब याना प्रति सदस्य 5 किलो मोफत तांदूळ दुकानदार याना पोहोच करण्याचे काम वेगाने सुरू आहे. सर्व लाभार्थ्यांनी नियमित रेशन चे धान्य उचल करून घ्यावे व त्यानंतर प्राधान्य कुटुंब व अंत्योदय कुटुंब यांनी मोफत तांदुळाचे धान्य उचल करावे. अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील प्रत्येक लाभार्थ्यांना दर महिन्याला ५ किलो तांदूळ एप्रिल, मे व जून या तीन महियामध्ये त्या, त्या ...