Posts

Showing posts from April 3, 2020

गायत्री परिवारातर्फे दररोज दोन हजार डब्याचे होतेय वाटप

Image
गायत्री परिवारातर्फे दररोज दोन हजार डब्याचे होतेय वाटप हिंगोली -   कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र सुरू असलेल्या लॉकडाऊन व सीमाबंदीमुळे बाहेर राज्यातून आलेले अनेक मजुर शहरात अडकले आहेत तसेच हातावर पोट असणारांची कामे खोळबंल्याने ते अडचणीत आहेत. तर जिल्‍हा सामान्य रुग्णालय व खासगी रुग्णालयात असलेल्या रुग्ण उपाशीपोटी राहणार नाहीत याची काळजी गायत्री परिवारातर्फे घेतली जात असून दररोज दोन हजार डब्‍बे पुरविले जात आहेत. मागच्या काही दिवसापासून लॉकडाऊन व सीमा बंद करण्यात आल्याने, शहरात तेलंगणा, तामीळनाडू, राजस्‍थान येथील ८०० मजूर तसेच जिल्‍हा सामान्य रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात देखील विविध आजराचे उपचार घेत असलेले रुग्ण हे उपाशीपोटी राहू नये यासाठी येथील गायत्री परिवाराने त्‍याच्या भोजनाची व्यवस्‍था करण्यासाठी पुढाकार घेतला असून मार्च महिण्यात (ता.२२) पासून या सर्वाच्या भोजनाची सकाळ व सायंकाळी अशी दोन वेळेस व्यवस्‍था केली जात आहे.   अन्नदानासाठी शहरातील दानशुरांचा पाठबळावर अन्नदानाचा उपक्रम सुरू आहे. यासाठी गायत्री परिवराराचे ६० स्‍वयंसेवक सहकार्य करीत आहेत. शहरात कोणी ...

खबरदार घराबाहेर फिरताना  आढळून आल्यास  कारवाई करणार

खबरदार घराबाहेर फिरताना  आढळून आल्यास  कारवाई करणार बळसोंड ग्रामपंचायतचा नागरिकांना इशारा हिंगोली -  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी घरातच बसून राहावे, अन्यथा विनाकारण फिरताना बाहेर आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार धडक कारवाई करण्याचा इशारा  बळसोंड ग्रामपंचायतच्या वतीने दिला आहे. दरम्यान ,कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात शुक्रवार ता.३ते ५ एप्रिल या कालावधीत ५६५ ग्रामपंचायत मध्ये लॉक डाऊन करण्यात आले असून या दरम्यान मेडिकल दुकाने वगळून  भाजीपाला, किराणा दुकान,व इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवक यांनी कोरोनाचा बचाव करण्यासाठी संचारबंदी काळात परवानगी घेतलेल्या व्यक्ती शिवाय इतर कोणतीही व्यक्ती घराबाहेर, रस्त्यावर विनाकारण फिरताना आढळून आल्यास त्या व्यक्तीवर कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाई करण्याचा इशारा बळसोंड ग्रामपंचायतचे ग्रामसेवक राजेश किलचे यांनी दिला आहे. ...