Posts

Showing posts from April 1, 2020

रामनवमीचा कार्यक्रम घरीच साजरा करा

रामनवमीचा कार्यक्रम घरीच साजरा करा हिंगोली -  येथील खाकीबाबा मठात दरवर्षी रामनवमीचा कार्यक्रम मोठ्या उत्‍साहात साजरा केला जातो. परंतू यावर्षी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी व जमावबंदी जिल्‍ह्‍यात लागू असल्याने गुरूवारी (ता.२) रामनवमीचा कार्यक्रम भक्‍तांनी मठात न येता घरीच साजरा करावा असे आवाहन महंत कौशल्यादास महाराज यांनी भावीकांना केले आहे.  शहरातून जाणाऱ्या औंढा नागनाथ रस्‍त्‍यावर कयाधू नदीच्या काठावर साडेतीनशे वर्षापुर्वीचा खाकीबाबा मठ आहे. या मठात राममंदिर असून येथे दरवर्षी रामनवमीचा कार्यक्रम मोठ्या उत्‍साहात साजरा केला जातो. त्‍यानंतर महाप्रसादाचे देखील वाटप केले जाते या कार्यक्रमात मोठ्या संख्येने भावीक सहभागी होता. दरम्‍यान, गुरूवारी रामनवमी आहे परंतू यावर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी व जमावबंदी असल्याने खाकीबाबा मठात होणारा कार्यक्रम यावर्षी होणार नाही.  त्‍यामुळे भावीकांनी येथे येण्याचे टाळावे रामनवमीचा कार्यक्रम सायंकाळी साडेसात वाजता अंगणात दिवे लावून आप आपल्या घरीच साजरा करावा. कोणीही घराच्या बाहेर निघू नये कोरोनाची साखळी...

जिल्‍ह्‍यातील बारा जणाचा दिल्‍लीच्या कार्यक्रमात सहभाग

जिल्‍ह्‍यातील बारा जणाचा दिल्‍लीच्या कार्यक्रमात सहभाग एकजण हिंगोलीत परतला, सामान्य रुग्णालयात दाखल,उर्वरित अकरा जण दिल्लीतच ठोकला मुक्काम हिंगोली -  जिल्‍ह्‍यातून दिल्‍ली येथे झालेल्या तबलिगे जमात संस्‍थेच्या एका धार्मिक कार्यक्रमात बारा जण गेले होते. त्‍यापैकी अकरा जण दिल्‍लीतच असून त्‍यापैकी एक जिल्‍ह्यात परत आला आहे. तो जिल्‍हा सामान्य रुग्णालयात दाखल झाला आहे. त्‍याचे स्‍वॅब नमुने औरंगाबाद येथे तपासणीसाठी पाठविले असल्याची माहिती जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली आहे.  दिल्‍ली येथे निजामुद्दीनमध्ये झालेल्या एका धार्मिक  कार्यक्रमाला जिल्‍ह्यातून बारा नागरीक गेले होते. त्‍यापैकी अकरा जण दिल्‍ली येथेच थांबले आहेत. त्‍यापैकी एक जण हिंगोली येथे परतला आहे. त्‍याला जिल्‍हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात भरती करण्यात आले आहे. सदरील रुग्णावर उपचार सुरू आहेत. त्‍याचे स्‍वॅब नमुने औरंगाबाद येथे वैद्यकिय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले. दरम्‍यान ,जिल्‍हा सामान्य रुग्णालयात असलेल्या दोन कोरोना संशयिताचा अहवाल बुधवारी...