नागनाथ संस्थानतर्फे गरजुंना पुरीभाजीच्या पॉकेटचे वाटप
नागनाथ संस्थानतर्फे गरजुंना पुरीभाजीच्या पॉकेटचे वाटप औंढा नागनाथ - येथे नागनाथ देवस्थानतर्फें शहरातील गोरगरीब व रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या गरजुंना पुरीभाजीच्या पॉकेटचे वाटप सोमवारी (ता.३०) करण्यात आले. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी सुरू असल्याने सर्वत्र बंद आहे. या काळात कोणी उपाशी राहूनये गरजुना अन्न मिळाले पाहिजे यासाठी देवस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या संकल्पनेतून अन्नदानाचे वाटप रविवारपासून सुरू करण्यात आले आहे. त्यांची नियमित अंमबजावणी केली जात असून सोमवारी तीनशे पॉकिट पुरी भाजीच्या पॉकेटचे शहरांमध्ये व शहराच्या आजूबाजूला राहणारे गोरगरीबांना वाटप करण्यात आले. तसेच ग्रामीण रुग्णालयांमध्ये आलेल्या रुग्णांना नाही हे पुरीभाजीचे पाँकेट वाटप करण्यात येत आहेत. यावेळी हे नागनाथ मंदिरातील अन्नक्षेत्रांमध्ये पुरी भाजी तयार करण्याचे काम सुरेंद्र डफळ, नारायण सोनटक्के, सत्यभामा काळे कौसाबाई काळे, लक्ष्मी काळे, विमल गोरे, लीलावती राऊत हे करत आहेत. आज सकाळी देवस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार पांडुरंग माचेवाड, विश्वस्त...