जुगार अड्ड्यावर छापा 46 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त
हिंगोली - जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश असताना जुगार खेळणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून जुगाऱ्याकडून 46 हजार 390 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून सतरा जणाविरुध्द शनिवारी गुन्हा दाखल केला आहे. या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहराच्या परिसरात भास्कर बांगर यांच्या शेतातील धुऱ्याजवळ एका बाभळीच्या झाडाखाली काही जण जुगार खेळत असल्याची गुप्त माहीती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्याप्रमाणे घटनास्थळी शनिवारी छापा टाकला असता यात गोपाल कुटे, आसीम पठाण, दुर्गेश मस्के, शाम कुटे, पुरुषोत्तम बांगर, आजीस सर्व राहणार मंगळवारा हिंगोली. लखन सांगळे राहणार भारतीविद्यामंदिर जवळ हिंगोली, शफी रफीक राहणार मंगळवारा हिंगोली, गजानन राहणार महादेववाडी, शाम थिटे राहणार मंगळवारा, अनिल काळे राहणार तलाब कट्टा, अमोल दरुगे राहणार मंगळवारा हिंगोली, विशाल सांगळे राहणार पोळा मारोती हिंगोली, शंकर सांगळे, महेश थिटे, योगेश थिटे तीघेही राहणार महादेववाडी हिंगोली, शेख इम्रान राहणार बावन खोली. हे सर्वजन झन्नामन्ना नावाचा जुगार खेळ खेळत असताना यापैकी...