Posts

Showing posts from March 24, 2020

जिल्‍ह्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सीमा बंद 

जिल्‍ह्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सीमा बंद  हिंगोली -  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सोमवारी (ता. 23) जिल्‍ह्‍याच्या सीमाबंद करण्याचे आदेश संबधित यंत्रणेला दिले आहेत.  जिल्‍ह्यात कोरोना आजारावर नियंत्रण आणण्यासाठी व प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्‍ह्‍यातील नागरीक बाहेर जिल्‍ह्‍यात प्रवास  करीत आहेत. तसेच बाहेर जिल्‍ह्‍यातील नागरीक देखील  हिंगोली जिल्‍ह्‍यात येत आहेत. त्‍याअनुषंगाने बाहेर जिल्‍ह्‍यातून येणाऱ्या नागरीक प्रवाशी यांच्या मार्फत कोरोना विषाणूचा संसर्ग पसरण्याची शक्‍यता नाकारता येत नाही त्‍यामुळे जिल्‍ह्‍यातील नागरीकांच्या आरोग्याचा सुरक्षेच्या  दृष्टीने प्रतिबंधात्‍मक उपाय योजना म्‍हणून जिल्‍हा प्रशासनाने सीमा बंद करण्याचे आदेश संबधीत विभागाला दिले आहेत.

जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर तोबा गर्दी जमाव बंदीचे होते उल्लंघन

Image
जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर तोबा गर्दी जमाव बंदीचे होते उल्लंघन हिंगोली - राज्य शासनाने कोरोना बाबत जिल्हाभरात जमाव बंदीचे आदेश लागू केले आहेत. तसेच आजपासून संचार बंदीचे आदेश काढल्याने पेट्रोल पंपावर गर्दी होत असल्याने चक्क जमाव बंदीच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे पाहावयास मिळत होते. कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू नये यासाठी,जिल्हाभरात आरोग्य विभागाच्या वतीने उपाय योजना राबविण्यात येत आहेत.कोरोना व्हायरस बाबत खबरदारी म्हणून रविवारी जनता कर्फ्यु पाळण्यात आला. त्यापूर्वी शनिवारी देखील रंगीत तालीम म्हणून बंद पाळण्यात आला होता.जमाव बंदी नागरिकांकडून पाळल्या जात नसल्याने सोमवारी मध्यरात्री पासून राज्य शासनाने संचार बंदी लागू केली आहे.त्यामुळे तरी कोरोनावर मात करता येईल.जिल्ह्यात आतापर्यंत आठ कोरोना संशयित रुग्ण आढळून आले मात्र त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागाने सुटकारा सोडला.आता राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्या दृष्टीने खबरदारी म्हणून नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे सांगितले जात असतानाही काही नागरिक विनाकारण रस्त्यावर येऊन गर्दी करीत आहेत. त्यामुळे...