पोलिसाच्या हाताला झटका देवून पळालेला आरोपी जेरबंद
पोलिसाच्या हाताला झटका देवून पळालेला आरोपी जेरबंद हट्टा पोलिस ठाण्यातील घटना, वसमत - तालुक्यातील हट्टा पोलिस ठाण्यात घरफोटी प्रकरणातील अटक असलेल्या आरोपी रविवारी सकाळी ४.४० वाजता लघुशंकेसाठी पोलिस घेऊन जात असताना त्यानेपोलिसाच्या हाताला झटका देवून पळून गेला त्याला स्थानिक गुन्हे शाखा व हट्टा पोलिसांनी परभणी जिल्ह्यातील मानगाव येथील एका शेतात अटक केली. या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हट्टा परिसरातील घरफोडी प्रकरणातील इश्चर पवार राहणार बिंबी ता. लोणार जि.बुलढाणा याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या घरून अटक करून हट्टा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले हा आरोंपी पोलिस कोठडीत आहे. रविवारी सकाळी 4.40 वाजता त्याला लघुशंकेसाठी पोलिस घेऊन जात असताना त्याने पोलिसाच्या हाताला झटक देवून तो फरार झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला यात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व हट्टा पोलिसांनी त्याची शोध मोहिम सुरू केली. फरार झालेला आरोपी परभणी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरि...