Posts

Showing posts from March 21, 2020

जिल्ह्यात १३५६ शौचालयाचे बांधकाम अद्यापही अपूर्णच!

जिल्ह्यात १३५६ शौचालयाचे बांधकाम अद्यापही अपूर्णच ! हिंगोली - जिल्ह्यातील ग्रामपंचायतीना बेसलाईन सर्व्हे नुसार दिलेले  शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण न करता आल्याने अद्यापही १ हजार ३५६  शौचालयाचे बांधकाम बाकी आहेत.  केंद्र व राज्य शासनाच्या वतीने जिल्हा परिषदेला ग्रामीण भागात हागणदारी मुक्त करण्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात येते. त्यानुसार पाणी व स्वछता विभागाच्या वतीने तज्ज्ञांच्या मार्फत सर्व्हेक्षण करून लाभार्थ्यांची निवड केली जाते. त्यानंतर प्रत्येकी बारा हजार या प्रमाणे शौचालय बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो.यामध्ये पायाभूत सर्व्हेक्षणातून सुटलेल्या कुटुंबाचा समावेश केला आहे. जिल्ह्याला बेस लाईन सर्व्हे नुसार  (एलओबी)पायाभूत सर्व्हेक्षणातून सुटलेल्या कुटुंबासाठी  २२ हजार ६३२ सौचालय बांधकामाचे उद्दिष्ट दिले होते. यामध्ये वीस हजार २७६ शौचालयाचे बांधकामे पूर्ण झाली तर १३५६  शौचालयाचे बांधकामे आद्यपही शिल्लक आहेत. यासाठी ग्रामसेवकाना शौचालय पूर्ण करण्यासाठी १६ मार्चची मुदत दिली होती. वारंवार सांगूनही तरी देखील सौचालयाचे बांधकामे पूर्ण झाली नाह...

अत्यावश्यक सेवा सोडून सर्व प्रतिष्ठाने कडकडीत बंद 

Image
अत्यावश्यक सेवा सोडून सर्व प्रतिष्ठाने कडकडीत बंद  बाजारपेठ बंदला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हिंगोली - कोरोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळून बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शनिवारी (ता.२१) जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवत प्रशासनाच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाने कंबर कसली असून कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध उपाययोजना करीत आहेत. त्यानुसार शनिवारी जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा सुविधा यात किराणा, मेडिकल, भाजीपाला सोडून इतर व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली.  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी रविवारी नागरिकांना रविवारी घरात बसून राहण्याचे आवाहन केले आहे.त्यामुळे बऱ्याच प्रमाणात का होईना यावर मात करण्यासाठी या उपाययोजना केल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी एकत्र जमा होऊ नये यासाठी गर्दीच्या ठिकाणी नियंत्रण ठेवण्यासाठी आता हॉटेल,पान टपरी, ऑटोरिक्षा,बेकरी, स्वीटमार्ट, धाबे,...

शॉर्टसर्किटमुळे सवना येथे ७० हजाराचा ऊस जळून खाक

Image
  सेनगाव - तालुक्यातील सवना येथील शेतकरी मधुकर  भोयाळकर यांच्या गट क्रमांक २७७ एक एकर शेतातील उभा ऊस शॉटसर्किट मुळे जळून खाक झाला असल्याची घटना शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली.यामुळे शेतकऱ्यावर अस्मानी संकट कोसळले आहे.   मधुकर भोयाळकर यांनी एक एकरात उसाची लागवड केली होती. आज घडीला ऊस तोडणीसाठी आला असताना शनिवारी अचानक शेतातून गेलेल्या विजेच्या पोलवरील तारांचे घर्षण होऊन शॉटसर्किट झाल्याने यात आजच्या घडीला तोडणी साठीआलेला ऊस शेतातून गेलेल्या विजेच्या पोलवरील तारांचे घर्षण होऊन शॉर्टसर्किट झाल्याने त्यांचे अंदाजे ६० ते  ७० हजारांचे  नुकसान  झाले असून  हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे .   परिसरात ऊस कारखाना नसल्याने या उसाला  शहरातील व ग्रामीण भागातील रसवंतीसाठी मोठ्या प्रमाणात मागणी असते .मात्र शॉर्टसर्किटमुळे तोडणीला आलेल्या ऊसाच्या शेतात ऊस पूर्णतः जळून खाक झाला शेतकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने  सर्वच  शेताला  घेराव घातला होता. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी आजूबाजूचे शेतकरी धावले असता त्यांना यश आले ना...

रविवारी जनता कर्फ्यूचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रविवारी जनता कर्फ्यूचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन   - जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी   हिंगोली, दि. 21:  कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवार, 22 मार्च रोजी अत्यावश्यक सेवा वगळता  देशाभरात जनता कर्फ्यू घोषित केला आहे. यामध्ये नागरिकांना सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत स्वत:हून संचारबंदी पाळावी असे आवाहन केले आहे. याकरीता शनिवारी रात्री 12 वाजल्यापासून रविवारी रात्री 10 वाजेपर्यंत देशभरातील पॅसेंजर रेल्वे बंद करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळवा. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून दि.  21 व 22 मार्च 2020 रोजी जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याच्या जिल्हाधिकारी यांनी केलेल्या  आवाहनाला शनिवार, दि. 21 रोजी जिल्ह्यातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यानुसारच पंतप्रधानांनी केलेल्या जनता कर्फ्यूचे आवाहनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील...

नापीकीला कंटाळून एकाची आत्‍महत्या

Image
  पळसगाव येथील घटना   वसमत -    सततच्या नापीकाला कंटाळून तुरीच्या ढिगारऱ्याला आग  लाऊन त्‍यात उडी मारून आत्‍महत्या केल्याची घटना शनिवारी  दुपारी बारा वाजता पळसगाव येथे घडली.   या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत तालुक्‍यातील पळसगाव येथील बालाजी संभाजी डाखोरे (वय ५५) याने सततच्या नापीकीला कंटाळून व बँकेचे घेतलेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेत सापडला होता. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास स्‍वतःच्या शेतातील आखाड्यावरील  तुऱ्हाट्याच्या ढिगाला आग लावून आगीत उडी मारून आत्‍महत्या केली आहे. या बाबत प्रभाकर संभाजी डाखोरे यांच्या फिर्यादीवरून वसमत पोलिस ठाण्यात आकस्‍मात मृत्‍यूची नोंद झाली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक बी. आर. बंदखडके हे करीत आहेत.