Posts

Showing posts from March 20, 2020

अंगणवाड्यातील पोषण पंधरवडा उपक्रम रद्द करा

Image
अंगणवाड्यातील पोषण पंधरवडा उपक्रम रद्द करा केंद्रीय सचिवाचे सर्व राज्यातील महिला बालकल्याण विभागाला पत्र हिंगोली - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरातील सर्व अंगणवाड्यात सुरु असलेला पोषण पंधरवाडा उपक्रम रद्द करण्याचे आदेश केंद्र शासनाच्या जॉइंट सेक्रेटरी अनुराधा चागती यांनी लेखी पत्राद्वारे  बालकल्याण विभागाला दिल्या आहेत. दरम्यान, देशभरातील अंगणवाड्यात ८ ते २२ मार्च या कालावधीत पोषण पंधरवाड्याचे आयोजन केले होते. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातील एक हजार ८९ अंगणवाड्यात पोषण पंधरवाड्या निमित्य जिल्हा परिषदेचे सीईओ राधाबिनोद शर्मा,धनवंत कुमार माळी, यांच्या मार्गदर्शनाखाली महिला बालकल्याण विभागाचे डेप्युटी सीईओ गणेश वाघ, सिडीपीओ धापसे, नयना पाटील ,यांच्यासह अंगणवाडी मुख्यसेविका, मार्फत अंगणवाडी केंद्रात एक ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना हात धुणे, प्रभात फेरी, पोषण आहाराचे महत्व, तर स्तनदा माता, गरोदर माता, किशोर वयीन मुलींना आहाराबाबत मार्गदर्शन असे विविध उपक्रम राबविण्यात येत होते. मात्र भारतात कोरोना व्हायरसचा प्रसार सुरु झाल्यामुळे उपाययोजना म्हणून इतरांना संसर्ग होऊ नये याची काळ...