Posts

Showing posts from March 17, 2020

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासकीय कार्यालयात गर्दी न करता ई-मेलच्या माध्यमातून पत्रव्यवहार करण्याचे  आवाहन

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासकीय कार्यालयात गर्दी न करता ई-मेलच्या माध्यमातून पत्रव्यवहार करण्याचे आवाहन  हिंगोली -  शासनाने कोरोना विषाणुचा  (कोव्हीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2020 पासून लागू करुन खंड 2,3, व 4 मधील तरतुदी नुसार अधिसूचना  निर्गमित केलेली आहे. कोरोना विषाणुचा (कोव्हीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी     शासकीय कार्यालयास भेट देणाऱ्या सर्व अभ्यांगतांच्या भेटी  दि. 31 मार्च, 2020 पर्यंत बंद करण्यात आल्या आहेत.  अभ्यांगत,नागरिकांना आपल्या कामाबाबत काही पत्रव्यवहार करावयाचा असल्यास त्यांनी संबंधीत  कार्यालयास ई-मेल, दूरध्वनी व इतर तत्सम मार्गाने पत्रव्यवहार करावा अथवा संपर्क साधावा. तसेच सर्व  कार्यालय प्रमुखांनी जास्तीत-जास्त कार्यालयीन कामकाज हे ई-मेल, दूरध्वनी व इतर तत्सम मार्गाने करावे. जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी कोणत्याही कारणाने कार्यालयात किंवा त्यांच्या कार्यक्षेत्रात गर्दी जमणार नाही याकरीता आवश्यक ते सर्व उपाय करावेत.  कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने या आदे...

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्था राहणार बंद

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्था राहणार बंद हिंगोली - जिल्ह्यात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये व जीवित हानी होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शहरी भागाप्रमाणेच आता ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्था ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी मंगळवारी( ता.१७) काढले आहेत. दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार उडाल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. हजारो नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे शोशल मीडिया व इतर माध्यमातून निदर्शनास येत आहे. आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाने सदर आजाराच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाच मार्च रोजीच्या पत्रकान्वये कोरोना व्हायरस प्रतिबंध आराखडा तयार केला आहे.त्यानुसार जिल्ह्यात कोरोना व्हायरस रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी ग्रामीण क्षेत्रातील सर्व जिल्हा परिषद ,सरकारी व खाजगी शाळा , महाविद्यालय आयुक्त, व्यावसायिक ,आणि प्रशिक्षण केंद यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी निर्गमित केले आहेत. दरम्यान दहावी, बारावी ,विश्वविद्यालयाच्या परीक्षा वेळापत्रका नुसार घेण्यात याव्यात असे...

हिंगोली बाजार समितीला जप्तीची नोटीस देताच केला कराचा भरणा 

Image
हिंगोली बाजार समितीला जप्तीची नोटीस देताच केला कराचा भरणा  नऊ लाख ३६  हजाराचा दिला पालिकेला धनादेश हिंगोली -  येथील बाजार समितीकडे इमारतीच्या कराची १८ लाख ७३ हजार ३१८ रुपये थकीत आहेत. याबाबत नगरपालिकेने मंगळवारी (ता.17) जप्तीची नोटीस देत सील ठोकताच बाजार समितीने ९ लाख ३६ हजाराचा धनादेश पालीका प्रशासनाकडे सुपुर्त केल्यानंतर लावलेले सील काढण्यात आले.   बाजार समितीकडे नगरपालिकेच्या करापोटी 18 लाख 73 हजार 318 रुपये येणे बाकी आहेत. या बाबत पालीका प्रशासनाने वेळोवेळी कराचा भरणा करावा त्‍या संदर्भाचे बील व नोटीस देखील दिली होती. परंतू बाजार समितीने आजपर्यत कराचा भराणा केला नाही. त्‍यामुळे महाराष्‍ट्र नगपरिषदा, नगरपंचायती व औद्योगीक नगरी अधिनियम 1965 चे कलम 152 नुसार रक्‍कम वसुलीसाठी मंगळवारी बाजार समिती यांच्या कार्यालयास सील लावून मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याचे नोटीस मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्या स्‍वाक्षरीने देण्यात आली.  तसेच नगरपालिकेचे उपमुख्यधिकारी उमेश हेंबाडे, प्रशासकिय अधिकारी शाम माळवटकर, डी. पी. शिंदे, व्ही.  एच. हेलचल. एम. व्ही. घुगे या पंचासमक...

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्था राहणार बंद

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्था राहणार बंद हिंगोली - जिल्ह्यात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये व जीवित हानी होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शहरी भागाप्रमाणेच आता ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्था ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी मंगळवारी( ता.१७) काढले आहेत. दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार उडाल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. हजारो नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे शोशल मीडिया व इतर माध्यमातून निदर्शनास येत आहे. आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाने सदर आजाराच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाच मार्च रोजीच्या पत्रकान्वये कोरोना व्हायरस प्रतिबंध आराखडा तयार केला आहे.त्यानुसार जिल्ह्यात कोरोना व्हायरस रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी ग्रामीण क्षेत्रातील सर्व जिल्हा परिषद ,सरकारी व खाजगी शाळा , महाविद्यालय आयुक्त, व्यावसायिक ,आणि प्रशिक्षण केंद यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी निर्गमित केले आहेत. दरम्यान दहावी, बारावी ,विश्वविद्यालयाच्या परीक्षा वेळापत्रका नुसार घेण्यात याव्यात असे...

शहरात पालिका प्रशासनातर्फे जंतुनाशकाची फवारणी

Image
शहरात पालिका प्रशासनातर्फे जंतुनाशकाची फवारणी हिंगोली  - शहरातील कोरोनाच्या खबरदारीसाठी विविध भागात नगरपालिकेच्या वतीने मंगळवारी (ता.17) जंतुनाशक फवारणी स्वच्छता विभागाच्या वतीने हाती घेण्यात आली आले आहे. शहरातील विविध भागात स्वच्छतेचे दृष्टिकोनातून जंतुनाशक पावडर व जंतुनाशक फवारणी करण्यात येत असून विविध भागातील शौचालय, नाल्या तसेच शहरातील प्रमुख ठिकाण अशा सर्व ठिकाणी फवारणी करण्यात येत असून कोरोना  व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभागाने विविध प्रभागांमध्ये जंतुनाशक फवारणी सुरू केली असून नागरिकांना कोरोना विषाणूच्या संदर्भात जनजागृती सुध्दा करण्यात येत आहे. पालीका प्रशासनातर्फे शहरात गल्‍लोगल्‍ली सकाळी घंटागाडीच्या माध्यमातुन ओला व सुका कचरा जमा करण्याचे काम सुरू आहे. यावेळी घंटागाडीवर देखील स्‍पीकरच्या माध्यमातून कोरोना बाबत जनजागृती करून त्‍या बाबत उपाय सांगण्यात येत आहे. पुर्वी या गाडीवर विविध गिताची धुन आता बंद झाली असून कोरोना विषयी जनजागृती भल्या पहाटेचा नागरीकांच्या कानावर पडत आहे.