Posts

Showing posts from March 16, 2020

हिंगोलीतील त्या दोघांचा अहवाल निगेटीव्ह

हिंगोलीतील त्या दोघांचा अहवाल निगेटीव्ह हिंगोली - हिंगोली शहरात पुणे व दुबई येथून आलेल्या दोघांना संशयीत नव्हे तर खबरदारीचा उपाय म्‍हणून दोन दिवसापुर्वी जिल्‍हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्‍यांच्या उपाचार करून त्‍याचे रिपोट तपासणीसाठी पुणे येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. सोमवारी (ता.१६) त्याचा अहवाल जिल्‍हा रुग्णालयात मिळाला असून त्‍या दोघांचाही रिपोट निगेटीव्ह आला असल्याची माहिती जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली.  या बाबत माहिती अशी की, येथील जिल्‍हा सामान्य रुग्णांलयात कोरोनाची लक्षणे आढळलेल्या दोन संशयीतावर सुरक्षेच्या दृष्टीने शनिवारी  उपचार सुरू करण्यात आले आहेत. यात एक पुणे येथून तर दुसरा दुबई मार्गे दोघेही ट्रव्हल्सने सकाळी आले होते. दोघांनाही सुरक्षीततेच्या दृष्टिकोनातून उपचारखाली ठेवले आले होते.    हिंगोली जिल्ह्यात कोरानाचा अद्याप एकही रूग्ण आढळुन आलेला नाही. प्रशासनाकडून खबरदारी म्हणून सर्व उपाय-योजना व जनजागृती केली जात आहे. परंतु दोन दिवसापुवी उपचारासाठी दाखल झालेल्या ...

इंटरनेटच्या युगात मामाचा गाव परका! 

इंटरनेटच्या युगात मामाचा गाव परका!    हत्ता नाईक -  झुक झुक झुक झुक आगिनगाडी पळती गाडी पाहूया मामाच्या गावाला जाऊया बालगीतांचा विसर आता पडलेला आहे .काळाच्या ओघात आणि इंटरनेटच्या जमान्यात मामाचा गाव हरवला असल्याचे चिमुकल्याना दिसत आहे.    काही वर्षांपूर्वी शाळेतील उन्हाळ्याची सुट्टी लागताच बच्चेकंपनी मनात बेत आखत असे,ते मामाच्या गावाला जाऊन धमाल करायची मौज, मज्जा मस्ती खेळ आणि फक्त खेळत मात्र सध्याच्या इंटरनेटच्या युगात मामाचा गाव परका झाला असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याची जागा आता फेसबुक ,व्हाट्सअप, आणि व्हिडिओ थ्रीजी गेमने घेतली आहे .वार्षिक परीक्षा संपली की उन्हाळ्याच्या सुट्टीची छोटे बाल मित्र आतुरतेने वाट पाहात असतात एकेकाळी उन्हाळ्याची सुट्टी म्हटली की ग्रामीण व शहरी भागातील मुले मामाच्या गावाला जाण्यासाठी आतुर असायची तिथे गेल्यावर भरपूर खेळ खेळायचे पोहण्यास, शिकायचे तासनतास विहिरीत दुबईचे मोज मस्ती करायची तसेच आजी-आजोबा मामा आपल्या नातवाची भाषेचे कौतुक करायचे मामाही आपल्या लाडक्या भाषेचे सर्व लाड पुरवायचे, त्यामुळे लहान मुले, सर्व नातेवाईकांना ओळखायचे ...

कोरोना विषानू खबरदारीमुळे नरसी येथील यात्रामोहत्सव रद्द 

कोरोना विषानू खबरदारीमुळे नरसी येथील यात्रामोहत्सव रद्द    तहसीलदार यांचे नामदेव संस्थानला पत्र   हिंगोली - कोरोना विषानूचा प्रादुर्भाव, प्रसार रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून नरसी येथील दरवर्षी प्रमाणे होणारा यात्रा मोहत्सव रद्द करण्याचे लेखी पत्राद्वारे तहसीलदार गजानन शिंदे यांनी संत नामदेव संस्थानला काळविले आहे.   जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजविला असताना जिल्ह्यात कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  साथरोग प्रतिबंध कायदा लागू करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी रुचेश  जयवंशी यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार कोरोना रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील यात्रा, मेळावे, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, यावर प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे निर्देश दिले आहेत.सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून  उपाय योजना म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम ९१५१चे कलम ४३  अन्वये जिल्ह्यातील नगरपालिका, नगर पंचायत क्षेत्रातील अंगणवाड्या ,शाळा, जिम, सिनेमागृह, ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.त्याकरिता तालुक्यात खबरदारीचा उपाय म्हणून नरसी येथील ...

जून्या मोंढ्यातील हॉटेलात युवकाचा निर्घृण खून

जून्या मोंढ्यातील हॉटेलात युवकाचा निर्घृण खून परभणी,दि.16(प्रतिनिधी)ःयेथील मध्यवस्तीतील जुना मोंढा परिसरातील न्यु दिलकश हॉटेलमध्ये एका 32 वर्षीय युवकाचा अज्ञात व्यक्तीने चाकुचे वार करीत शनिवारी(दि.14) सकाळी 11 च्या सुमारास निर्घृण खून केला. पोलिसांनी त्या अज्ञात आरोपीस अवघ्या काही तासाच जेरबंद करून गुन्ह्याची उकल केली. नानलपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुना मोंढ्यात शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास शेख हमीद शेख हुसेन(वय32 रा.मराठवाडा प्लॉट) भागातील युवक दाखल झाला. त्याने हॉटेल मालकास ऑर्डर दिल्यानंतर तो टेबलवर बसला. त्याच क्षणी तोंड्यास रुमाल बांधून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने धारधार चाकूद्वारे शेख हमीद शेख हुसेन यांच्या मांडीवर आणि पोटावर चाकुने सपासप वार केले. त्यास गंभीर जखमी केल्या बरोबर तो आरोपी तेथून फरार झाला. हॉटेल मालकाने तात्काळ धाव घेवून शेख हमीद शेख हुसेन यास अन्य काही सहका-यांच्या मदतीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतू मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने उपचार सुरू होण्यापुर्वीच शेख हमीद शेख हुसेन याचा मृत्यू झाला. या खळबजनक घटनेबाबत नानलपेठ पोलिस व स्थानिक गुन्हा अ...

पत्नीचा खून करुन पतीची आत्महत्या

पत्नीचा खून करुन पतीची आत्महत्या खानापूर परिसरातील खळबळजनक घटना, नेहमीचा वाद गेला टोकाला परभणी,दि.16(प्रतिनिधी)ःपती-पत् नीच्या वादातून पतीने पत्नीवर धारधार शस्त्राने वार करून तिचा खून केल्या पाठोपाठ स्वतः आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी(दि.14) दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास खानापूर भागात घडली. कृष्णा माने(वय30), कमल जाधव-माने(वय25) असे मृत पती, पत्नीचे नाव आहे. वसमत रस्त्यावरील खानापूर भागात माने कुटुंबिय वास्तव्यास आहेत. त्या कुटुंबातील कृष्णा माने हे  आई, वडील,पत्नी, एक मुलगा, भाऊ, भावजयसह एकत्रीत राहत होते. दुधगाव शिवारात शेती करणारे माने यांच्या पत्नी कमल जाधव-माने या नानलपेठ पोलिस ठाण्यात महिला पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या. पाच वर्षापुर्वीच या दोघांचे लग्न झाले होते. त्यांना दोन वर्षापुर्वी मुलगा झाला. त्यामुळे कुटुंब आनंदात होते.मात्र या दांम्पत्यात वादविवाद सुरू झाला. दोघांचेही पटनासे न झाल्याने वादविवादाचे रूपांतर भांडतंट्यात होत. त्यातच कृष्णा माने हे दारूच्या आहारी गेलेले होते. त्यातून या दांम्पत्यातील वाद अलीकडे टोकाला जात होता. शनिवारी देखील दुपारी दोनच्...

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास सर्वोच्च प्राधान्य

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास सर्वोच्च प्राधान्य   सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर भाविकांची गर्दी बंद करा मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश   हिंगोल - कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्य शासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र गर्दी थांबविण्यासाठी काटेकोर प्रयत्न करावेच लागतील. या दृष्टीने सर्व धर्मिकस्थळांवर नियमित पूजा अर्चा सुरु ठेवून भाविकांची गर्दी मात्र थांबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले.    साथरोग प्रतिबंध कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असून रोगाचे हे संकट टळल्यानंतर धार्मिक सण, उत्सव पूर्ववत साजरे करता येतील. या क्षणी जनतेचे आरोग्य हे एकमेव प्राधान्य आहे. कोणत्याही पक्ष संघटनांचे राजकीय कार्यक्रम, समारंभ, मेळावे कोरोना रोगाचा प्रादुर्भाव असल्यामुळे होऊच नयेत असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.   आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्...

बाळापूरात कोरोनाच्या खबरदारासाठी बाजारपेठ बंद 

बाळापूरात कोरोनाच्या खबरदारासाठी बाजारपेठ बंद    आखाडा बाळापूर -  येथे मंगळवारी (ता.17) भरणारा आठवडी बाजार कोरोनाच्या खबरदारीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे आदेश जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत.    या बाबत जिल्‍हाधिकारी यांनी एका पत्रकाद्वारे माहिती दिली आहे की. बाळापूर येथे दर मंगळवार भरणाऱ्या बाजारात सर्व प्रकारची दुकाने लावणार्या व्यापाऱ्यांनी तसेच बाजार ला येणाऱ्या सर्व नागरीकांना कळविण्यात येते की,भारत देशात व राज्यात पसरणाऱ्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी होणाऱ्या कार्यक्रम व ठीकाणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बाळापूर येथे दर मंगळवार आठवडी बाजार भरतो.यामुळे या ठीकाणी शहरात गर्दी होते. शहरातील व बाहेर गावाहून आलेली असंख्य नागरीक एकत्र येतात हे टाळण्यासाठी आठवडी बाजार बंद ठेवणे आवश्यक झाले आहे.     त्‍यामुळे मंगळवारी (ता.17) भरणारा आठवडी बाजार बंद ठेवण्यात येत आहे.यामुळे आठवडी बाजारात सर्व प्रकारची दुकाने लावणाऱ्या व्यापाऱ्यांनी व नागरीकांनी या बाबतची नोंद घ्यावी. असे आवाहान पोलीस निरीक्षक विकास थोरात यांनी केले आहे.