कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू
कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू हिंगोली,दि.13: आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशातंर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरुन व देशातंर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात सर्वत्र प्रवास करीत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूंचे संशयीत रुग्ण हिंगोली शहरात आढळून येण्याची शक्यता असून यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने त्यावर तात्काळ सनियंत्रण करुन संसर्गात वाढ होऊ नये तसेच त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी हिंगोली जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केल्याचे आदेश दिले आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांची तर जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांची सनियंत्रक म्हणून नियुक्ती केली आहे. या कायद्यातंर्गत औषध विक्रेते यांनी जास्त भावाने मास्क विक्री केल्यास, औषधांच...