Posts

Showing posts from March 6, 2020

अर्थसंकल्पात औंढा, नरसी नामदेव साठी भरीव तरतूद

Image
अर्थसंकल्पात औंढा, नरसी नामदेव साठी भरीव तरतूद   हिंगोली - राज्य सरकारने शुक्रवारी अर्थसंकल्प सादर केला असून कही गम तर कही खुश असा समाधानकारक हा अर्थसंकल्प आहे. जिल्ह्यातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ देवस्थान तीर्थक्षेत्र आणि संत नामदेवांचे जन्मस्थळ असलेल्या नरसी नामदेव तिर्थक्षेत्राला भरीव निधीची तरतूद केली असल्याने भाविकात समाधान व्यक्त होत आहे.   तसेच कृषी, सिंचन क्षेत्रासाठी देखील भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचप्रमाणे जलयुक्त शिवार अभियान योजनेत ही मागील सरकारच्या काळात अपूर्ण कामांना निधी उपलब्ध करून दिला आहे. तर दोन लाखपुढील कर्जाची परतफेड केल्यास दोन लाखाचे पीक कर्ज माफ होणार आहे. तसेच नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यास पन्नास हजार प्रोत्साहन निधी दिला जाणार आहे. त्यामुळे या निर्णयाचे स्वागत शेतकऱ्यातून होत आहे. तसेच महिला व युवक यासाठी भरपूर योजना असून त्यासाठी देखील सरकारने भरघोस निधीची तरतूद केली आहे.         Reply Reply to all Forward

ग्रामपंचायत निवडणूकीत नामनिर्देशन पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक

नामनिर्देशनपत्रात जातवैधता प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक   राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय   हिंगोली -  ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीत नामनिर्देशन पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आल्याचा राज्य निवडणूक आयोगाने निर्णय घेतला असून सर्व जिल्‍हाधिकारी यांना या बाबत निवडणूक आयोगाने गुरूवारी (ता.५) एका पत्राद्वारे जिल्‍हाधिकारी यांनी कळविले आहे.    ग्रामविकास विभाग शासन अध्यादेशानुसान सप्टेंबर २०१९  अन्वये राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कायचक्रर्मानुसार सार्वत्रिक किंवा पोटनिवडणूक कार्यक्रमासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी जुन ता.२०, किंवा त्‍यापुवीचा असेल त्याबाबतीत नामनिदेशन पत्रासोबत वैधता प्रमाणपत्र देण्यासासाठी  पडताळणी समीतीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यपत्र किंवा पडताळणी समीतीकडे अर्ज केलाअसल्याबाबतचा  अन्य कोणताही पुरावा आणी निवडूण आल्याचा तारखेपासून बारा महिण्याच्या आत पडताळणी समितीने  दिलेले वैधता प्रमाणपत्रसादर करील, असे हमीपत्र सादर करण्याची मूभा उमेदवारांना दिली होती.  मात्र या  अध्यादेशाच...

राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिवपदी परमेश्वर इंगोले 

Image
राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिवपदी परमेश्वर इंगोले    हिंगोली -  राष्ट्रवादी युवक काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी येथील परमेश्वर इंगोले पाटील यांची निवड झाल्याचे तसे पत्र राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी सोपविले आहे.    गेल्या अनेक वर्षा पासून विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थी, युवक तसेच शेतकऱ्यांचा प्रश्नावर परमेश्वर इंगोले पाटील  यांनी नेहमी  सरकारच्या विरोधात आवाज उठविलेला आहे.तसेच सामाजिक समस्यांसाठी वेळोवेळी आंदोलन, मोर्चे,उपोषण  केले आहेत. व त्यांचा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात चळवळीत काम करणाऱ्या युवकांसोबत दांडगा संपर्क आहे. या  सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार  यांनी परमेश्वर इंगोले पाटील सोबत काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटनेच्या युवकांची मुंबई येथे बैठक घेतली.  त्या बैठकीत शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी व फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार पक्षाचा माध्यमातून तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी राष्ट्रवादी पक्षांमध्ये काम करण्याचे सर्वांच्या मताने ठर...

भेसळयुक्त बियाणांचे प्रकरणात अर्थपूर्ण तडजोड विद्यापीठाद्वारे पध्दतशीरपणे घुमजाव

भेसळयुक्त बियाणांचे प्रकरणात अर्थपूर्ण तडजोड विद्यापीठाद्वारे पध्दतशीरपणे घुमजाव, कृषीमंत्र्याचेही गुळमुळीत धोरण परभणी,दि.06(प्रतिनिधी)ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने महाबीजसह हजारों शेतक-यांना पुरवठा केलेल्य भेसळयुक्त बियाण्यांच्या प्रकरणात  विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांनी वरिष्ठ अधिका-यांसह संशोधन वगैरे कोणीही जबाबदार नसल्याचा सुर आळवून पीक काढणीच्या वेळी कनिष्ठ कर्मचा-यांनी कबाईड हार्व्हेस्टींग यंत्राचा वापर केलामुळेच  काही बियाणे भेसळयुक्त झाल्याचा दावा केला. राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनीही त्याच गोष्टीची रि ओढून तो प्रकार अवधानाने झाल्याचे नमुद केले. एकंदरीत अर्थपूर्ण तडजोडीच या प्रकरणातील गांभीर्य नष्ट करत असून थातूरमातूर कारवाया करीत  हे प्रकरण पध्दतशीरपणे दडपले जाईल, असे स्पष्ट संकेत आहेत. माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या दोन दिवसांपुर्वी विधानसभेत परभणी कृषी विद्यापीठातंर्गत भेसळयुक्त बियाणां बाबतचा मुद्दा उपस्थित केला. त्याद्वारे विद्यापीठातंर्गत कुलगुरूसह संबंधीत वरिष्ठां विरोधात कठोर कारवाई व्हावी, अशी...

आ.रत्नाकर गुट्टेंना मिळाला जामिन

Image
रासपचे आ.रत्नाकर गुट्टेंना मिळाला जामिन सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, शेतक-यांच्या नावे कोट्यावधीचे कर्ज प्रकरण गंगाखेड,दि.06(प्रतिनिधी)ः शेतक-यांच्या नावाने परस्पर कोट्यावधी रुपयांचे कर्ज उचलल्या प्रकरणी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केलेल्या गंगाखेड शुगर्सचे सर्वोसर्वा व रासपचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांना गुरूवारी (दि.पाच) सर्वोच्च न्यायालयाने जामिन मंजूर केला. तब्बल 346 दिवस कारागृहात राहिलेले व कारागृहातूनच 2019 ची  विधानसभा निवडणुक लढवून विजयी ठरलेलेे डॉ.गुट्टे यांना न्यायालयाच्या या निर्णयाने दिलासा मिळाला आहे. गंगाखेड शुगर्सच्या कर्जप्रकरणात 26 मार्च 2019 रोजी उद्योजक रत्नाकर गुट्टे यांना औरंगाबादच्या सीआयडी पथकाने अटक केली होती. तेव्हापासून ते कारागृहातच होते. तेथूनच गुट्टे यांनी अटकपुर्व जामिन मिळावा म्हणून औरंगाबाद खंडपीठात वारंवार अर्ज केला. परंतू न्यायालयाने गुट्टे यांचा जामिन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळेच गुट्टे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. गंगाखेड शुगर्सने 29 हजार शेतक-यांच्या नावाने सहा बँकांकडून 328 कोटी रुपयांचे पीककर्ज उचललेले होते. कारखान्याच्या ...

जिल्‍ह्‍यात विविध विभागाचा 933.94  कोटीचा निधी  अखर्चित

जिल्‍ह्‍यात विविध विभागाचा 933.94  कोटीचा निधी  अखर्चित जिल्‍हाधीकारी यांच्या उपस्‍थितीत झालेल्या बैठकीतील माहिती. -------------- हिंगोली,ः जिल्ह्यात नियोजन विभागाच्या वतीने विविध विभागाला विकास कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली जाते, मात्र आतापर्यंत 933. 94 कोटी रुपयांचा निधी अखर्चित आहे.   येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रुचेश  जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन विभागाची बैठक  झाली. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश  गिरगावकर ,अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनियार,निवासी  उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी,सीईओ धनवंतकुमार  माळी, अतिरिक्त सीईओ डॉ. मिलिंद पोहरे, यांच्यासह  विविध विभागाच्या प्रमुखांची उपस्थिती होती.   जिल्‍ह्‍याला विविध विकास कामासाठी एकूण 758.13  कोटी रुपयाचा निधीची तरतुद करण्यात आली होती त्यापैकी  908.36 कोटी रुपयाचा निधीचा योजनेवर खर्च झाला तर  933.94 कोटी रुपयाचा निधी अद्याही अखर्चीत आहे.  मृद संधारण उपाय योजनेद्वारे जमिनीचा विकास करण्यासाठी  अधीक्षक कृषी अधिकारी विभाग...