हिंगोली शहरासह परिसरात अवकाळी पावसाच्या सरी
हिंगोली शहरासह परिसरात अवकाळी पावसाच्या सरी आठवडी बाजारात उडाली धांदल - हिंगोली - शहर व परिसरात रविवारी (ता.1) सायंकाळी सात वाजता मेघ गर्जनेसह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या या पावसाने शहरातील अकोला बायपास भागात सुरू असलेल्या आठवडी बाजारात खरेदी विक्रीसासाठी आलेल्या नागरीक व ग्राहकांची धादंल उडाली. रात्री उशीरापर्यत हा पाऊस शहरात सुरूच होता. हिंगोली शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळी सातच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या अकोला बायपास भागात पावसाचा जोर अधिक होता पंधरा ते वीस मिनीट झालेल्या या पावसाने येथे सुरू असलेल्या आठवडी बाजारात मोठी धादंल उडाली अकोला बायपास भागात दर रविवारी आठवडी बाजार भरतो तो रात्री उशीरापर्यंत सुरू असतो. आज झालेल्या अवकाळी पावसाने बाजारात धादंल उडाली होती. दरम्यान हा पाऊस शहरासह तालुक्यातील बळसोंड, पिंपरखेड, कारवाडी, खांबाळा तसेच कळमुनरी शहरात देखील पाऊस झाला. सध्या शेतशिवारात रब्बीतील हरभरा पिकाच्या काढणीची कामे काही ठिकाणी सुरू असल्याने शेतकऱ्याची अवकाळी पावसाने गैरसोय झाली. शहरात पाऊस सुरू झाल्यावर अनेक भागातील...