Posts

Showing posts from February 27, 2020

सीईओ डॉ. तुमोड यांचीऔरंगाबाद येथे बदली

Image
सीईओ डॉ. तुमोड यांचीऔरंगाबाद येथे बदली   हिंगोली - येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हानमलू तुमोड यांची नवीन शहरे औरंगाबाद येथे मुख्य प्रशाशक म्हणून रिक्त पदी झाल्याचे आदेश अवर सचिवानी  गुरुवारी काढले आहेत.   दरम्यान, औरंगाबाद येथील नवीन शहरे मुख्य प्रशासक पदी मधुकर आर्दड यांची बदली अन्य ठिकाणी झाल्याने ते रिक्त पद झाले होते. त्या ठिकाणी हिंगोली येथील जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. तुमोड यांची अव्वर सचिवाने नियुक्ती केली आहे. दरम्यान, सीईओ तुमोड हे यापूर्वी अप्पर जिल्हाधिकारी म्हणून उत्कृष्ट जबाबदारी पार पाडली होती. त्यानंतर त्यांची बदली झाली. परत डॉ. तुमोड यांची हिंगोली जिल्हा परिषदेच्या सीईओ पदी तीन वर्षांपूर्वी नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांना भाप्रसे कॅडर मिळाले. मागील तीन वर्षा पासून तुमोड यांनी पदाधिकारी आणि अधिकारी यांच्यात चांगला दुवा निर्माण करून खेळी मेळीचे वातावरण निर्माण केले. रेखावार यांच्या वर पदाधिकाऱ्यांनी अविश्वास ठराव आणल्यानंतर तुमोड यांची सीईओ पदी नियुक्ती झाली. चांगल्या अधिकाऱ्यांना हा जिल्हा कठीण जाणारा ठरला, त्यामुळे जिल्हा परिषदेने कर्तव्य...

शासकीय कामात अडथळा प्रकरणी एकावर गुन्हा

Image
शासकीय कामात अडथळा प्रकरणी एकावर गुन्हा   हिंगोली -प्लास्टिक जप्त अधिकार करण्याचे अधिकार आहे का असे विचारले असता,त्यांना प्लास्टिक बंदी कायद्याची दिली आणि या कारवाई मध्ये हस्तक्षेप करू नये असे सांगितले. मात्र तो अरेरावीची भाषा करून शिवीगाळ केली, आमदारांचा नातलग आहे. असे म्हणून शासकीय कामात अडथळा निर्माण करून अपंगाचा फायदा उचलतो असे बदनामीकारक मचकुर फेसबुक वरून केल्या प्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे.   याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पालिकेचे सीओ रामदास पाटील यांच्या फिर्यादी नुसार मंगळवारी( ता.२५) दुपारी चारच्या सुमारास पालिकेच्या वतीने शहरातील शुभ मंगल साडी व रेडिमेट या दुकानातून प्लस्टिक जप्त केले होते.याप्रकरणी आरोपी गोविंद भवर राहणार जामठी यांनी फेसबुक वरून रामदास पाटील यांच्या विरोधात बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे पाटील यांनी शहर पोलिसात शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.         Reply Reply to all Forward