Posts

Showing posts from February 20, 2020

सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्थांनी प्रस्ताव करावेत

सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्थांनी प्रस्ताव करावेत लातूर,दि.20:- जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर च्या कार्यालयात जिल्हा वार्षिक योजना सन 2019-20 योजनांचे मुल्यमापन सनियंत्रण व डाटा एंट्री करणे या योजनेअंतर्गत 2 लिपीक कम डाटा एंट्री ऑपरेटर ची आवश्यकता असून सदर कामगार 11 महिण्याच्या कालावधी करीता दरमहा 9600/- मानधनावर सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्थांमार्फत पुरवठा करावयाचे आहेत. तरी सदर मनुष्यबळ पुरविणे कामी सक्षम असलेल्या कामाच्या अटी व शर्ती इत्यादी ची पुर्तता करु शकणाऱ्या इच्छूक /पात्र सुशिक्षीत बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थानी आपले प्रस्ताव विहीत नमुन्यात सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तंत्र प्रशाला केंद्र,क्रीडा संकूल, औसा रोड,लातूर यांच्याकडे दिनांक 26 फेब्रुवारी 2020 पर्यंत कार्यालयीन वेळेत (सायंकाळी 05.45) पर्यंत सादर करावे. त्यानंतर प्राप्त झालेल्या प्रस्तावांचा विचार करण्यात येणार नाही. तसेच कामाच्या अटी व शर्ती इत्यादी चा सविस्तर तपशिल जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकी...

खर्चाला फाटा देत भागवत सप्ताहात विवाह सोहळा

Image
  वसमत - तालुक्‍यातील जोडपरळी येथे सुरू असलेल्या भागवत सप्ताहात खर्चाला फाटा देत गुरूवारी  परळी येथील शोभा व तपोवन येथील मुंजाजी हे दोघे विवाहबध्द झाले आहेत.    जोडपरळी येथे सुरू असलेल्या भागवत सप्ताहात खर्चाला फाटा देत विवाह सोहळा हजारो वऱ्हाडी मंडळीच्या उपस्‍थितीत संपन्न झाला. जोड परळी येथील  बालासाहेब दशरथे यांची मुलगी शोभा हीचा विवाह तपोवन येथील रमेशराव कदम यांचा मुलगा मुंजाजी यांचे सोबत ठरला होता. गावात सुरू असलेल्या सप्ताहातील मंडळीने हा विवाह सप्ताहात करावा अशी कल्‍पना वधु पिता बालासाहेब दशरथे यांनी दिली. त्‍यांनी ही माहिती कुटूंबीयाना मुलगी शोभा हिला देखील सांगितली.    त्‍यानंतर वर व वराचे वडील यांना याची कल्‍पना देण्यात आली. त्‍यांच्या होकारानंतर हा विवाह ठरला त्‍याप्रमाणे गुरूवारी येथील पंचलिग महादेव मंदिरात सुरू असलेंल्या भागवत सप्ताहात शोभा व मुंजाजी खर्चाला फाटा देत विवाह बध्द झाले आहेत. यावेळी राजेश्वर महाराज काळे व गावकरी मंडळी यांच्या उपस्‍थितीत हा विवाह सोहळा मोठया थाटात संपन्न झाला. या कार्यामुळे शेतकरी कुंटुबात समाधान व्यक्त होत असल्...

चिखली येथे शेतकऱ्याची आत्‍महत्या

Image
  कळमनुरी -  तालुक्‍यातील चिखली येथील एका शेतकऱ्याने नापीकीला कंटाळून राहत्या घरी गळफास घेवून आत्‍महत्या केल्याची घटना बुधवारी (ता.१९) घडली.    या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाळापूर पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या चिखली येथील गणेश रामराव चव्हाण (वय36) यांनी बुधवारी सकाळी स्‍वतःच्या राहत्या घरी तीन वर्षापासून शेतात नापिकी होत असल्याने व यावेळी शेतातील सोयाबीन पावसाच्या पाण्याने वाहून गेल्याने शेतातील नापीकीला कंटाळून कोणासही न बोलता तेव्हापासून ताण तणावात राहून त्‍याचे राहते घरात नायलोनच्या दोरीने गळफास घेवून आत्‍महत्या केली. या बाबत राजकुमार चव्हाण यांनी बाळापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून आमस्‍मात मृत्‍युची नोंद बुधवारी झाली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

जिल्‍हा परिषदेच्या क्रीडा स्‍पर्धा 

आज क्रिकेट, कब्‍बडी, हॉलीबॉल संघात अंतीम लढत    जिल्‍हा परिषदेच्या क्रीडा स्‍पर्धा    हिंगोली - येथील संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर जिल्‍हा परिषदेच्या तीन दिवसीय क्रीडा स्‍पर्धा सुरू झाल्या आहेत यात क्रिकेट मध्ये पंचायत समिती हिंगोली व कळमनुरीत अंतीम लढत होणार कब्‍बडीत पंचायत समिती कळमुनरी व सेनगाव यांच्या तर  हॉलीबॉलमध्ये वसमत व औंढा पंचायत समितीच्या संघात अंतीम लढत होणार आहे. हे संघ गुरवारी  झालेल्या स्‍पर्धेत उपविजेते ठरले आहेत.      महसुल विभागाच्या धर्तीवर जिल्‍हा परिषदेतर्फे अधिकारी. पदाधीकारी व कर्मचाऱ्यासाठी तीन दिवसीय क्रीडा व सांस्‍कृतीक स्‍पर्धेचे आयोजन गुरूवारपासून करण्यात आले आहे. गुरूवार घेण्यात आलेल्या क्रिकेट स्‍पर्धेत हिंगोली पंचायत समिती व जिल्‍हा परिषद मुख्यालय यांच्यात सामना झाला यात हिंगोली पंचायत समितीने मुख्यालयाचा पराभव करीत अंतीम फेरी गाठली आहे. तर दुसऱ्या एका सामन्यात सेनगाव  व औंढा या संघात सामना झाला यात औंढ्याच संघ विजेता ठरता आता अंतीम सामना हिंगोली व औंढा पंचायत समिती यांच्यात रंगणार आहे.    कब्...

गॅस सिलेंडरच्या गळती मुळे स्फोट झाल्याने दै.सामना चे पत्रकार माणिक केंद्रे यांचे दुखद निधन, 

Image
प्रतिनिधी : पाथरी  गॅस सिलेंडरच्या गळती मुळे स्फोट झाल्याने दै.सामना चे पत्रकार  माणिक केंद्रे यांचे दुखद निधन   पाथरी:-दैनिक सामनाचे पाथरी तालुका प्रतिनिधी माणिक केंद्रे यांचे बुधवारी पहाटे निधन झाले.   सेलू येथे गॅस सिलेंडरच्या गळती मुळे स्फोट झाल्याने पत्नी सह माणिक केंद्रे हे गंभिर जखमी झाले होते त्यांच्यावर सेलू,परभणी,औरंगाबाद ,अकोला येथे उपचार सुरू होते. उपचार सुरू असतांना बुधवार १९ फेब्रुवारी रोजी पहाटे त्यांचे दुखद निधन झाले.माणिक केंद्रे हे पाथरी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष होते. दैनिक सामनाच्या माध्यमातून त्यांनी निर्भिड पणे रोकठोक लिखान केले होते.पत्रकारीतेत सक्रीय असतांना सामाजिक कार्यातही ते सातत्याने पुढे येत.मनमिळाऊ स्वभावा मुळे मोठा मित्रपरीवार होता. बुधवारी त्यांच्या निधनाची दुख:द वार्ता येताच मुदगल या त्यांच्या गावा सह मित्रपरिवार दुखात बुडाला गुरूवारी सकाळी मुदगल येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पत्रकार माणिक केंद्रे यांच्या पश्चात पत्नी,दोन मुलं,एक मुलगी, आई,भाऊ,बहीन असा परिवार आहे.

हॉलीबाल ,कबड्डी स्पर्धेचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

Image
हॉलीबाल ,कबड्डी स्पर्धेचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन हिंगोली -येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर तीन दिवसीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाला गुरुवारी सुरुवात झाली. यावेळी हॉलिबाल, कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले, उपाध्यक्ष मनीष आखरे,समाजकल्यान सभापती फकिरा मुंडे, महिला बालकल्याण सभापती रुपाली ताई पाटील गोरेगावकर,  जीप सदस्य संजय देशमुख,बाळासाहेब मगर, विठ्ठल चौतमल,डॉ.सतीश पाचपुते, पोलीस अधीक्षक योगेशकुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे,सीईओ डॉ. एच. पी. तुमोड, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे ,डेप्युटी सीईओ धनवंतकुमार माळी, नितीन दाताळ,लेखा वित्त अधिकारी दे. का. हिवाळे यांच्यासह विभाग प्रमुखांची उपस्थिती होती. यावेळी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.